Home शासकीय अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटकांसाठी ‘स्टँड अप इंडिया’योजना

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटकांसाठी ‘स्टँड अप इंडिया’योजना

0 second read
0
0
166

no images were found

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटकांसाठी स्टँड अप इंडियायोजना

कोल्हापूर : केंद्र शासनाने सन 2015 मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सिडबी हमी देईल, असे समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सचिन साळे यांनी कळविले आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावी. केंद्र शासनाच्या  स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेऊन प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटक उद्योजकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. साळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार पुष्पाच्या हृदयस…