Home शैक्षणिक विबग्योर हाय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील विक्रमी कामगिरी

विबग्योर हाय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील विक्रमी कामगिरी

9 second read
0
0
61

no images were found

विबग्योर हाय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील विक्रमी कामगिरी

कोल्हापूर/ (प्रतिनिधी):विबग्योर हाय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेतील उत्तुंग यश आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक विक्रमांनी शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या धोरणाची प्रचीती दिली आहे.

       *शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश*
सीबीएसईच्या दहावीच्या निकालात शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले. जवळपास ७५% विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवले, तर ३७ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवून शैक्षणिक पराक्रम सिद्ध केला. भविष्यातील महत्त्वपूर्ण विषय मानल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मध्ये १८ विद्यार्थ्यांनी तर इंग्रजीत ७ विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवत शाळेच्या प्रगत अभ्यासक्रमाची गुणवत्ता अधोरेखित केली.

याशिवाय, सातवीचा विद्यार्थी सुश्रुत अमरसिंग पाटील याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक विज्ञान प्रतिभा शोध परीक्षात सुवर्णपदक पटकावून आपल्या बौद्धिक क्षमतेची चमक दाखवली.

         *क्रीडा क्षेत्रातील विक्रम*

शैक्षणिक पराक्रमासोबतच क्रीडाक्षेत्रातही विबग्योर हायच्या विद्यार्थ्यांनी विक्रम प्रस्थापित केले आहेत. सातवीचा विद्यार्थी केदार विजय साळुंखे याने एस३ डुएथलॉन (५ किमी धावणे, २० किमी सायकलिंग आणि २.५ किमी धावणे) केवळ १ तास २९ मिनिटांत पूर्ण करून सर्वात कमी वयाचा स्पर्धक होण्याचा मान पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला या स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून गौरविण्यात आले.

केदारने स्केटिंग आणि सायकलिंग या क्रीडाप्रकारांमध्ये १७ जागतिक आणि १५ राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. इतकेच नव्हे, तर अवघ्या ७व्या वर्षी ‘द डायोसीस ऑफ एशिया, चेन्नई’ कडून ॲथलेटिक्समध्ये डॉक्टरेट पदवी बहाल होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

        *शाळेचा सर्वांगीण विकासाचा पाया*

विबग्योर हाय कोल्हापूरने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि क्रीडा या क्षेत्रांत सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच शैक्षणिक उत्कृष्टता आणि क्रीडाविक्रम या दोन्ही आघाड्यांवर विद्यार्थ्यांनी नवा इतिहास रचला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…