no images were found
उपवासापासून ते रात्रभर गरबा खेळण्यापर्यंत, सोनी सब कलाकार त्यांचे आवडते नवरात्रीचे सण साजरे करण्याचे परंपरा शेअर करत आहेत.
नवरात्रीचा सळसळता, थिरकणारा सण जवळ आला आहे. हे देशभरात आनंदाचे, भक्तीचे आणि जल्लोषाचे पर्व आहे. दुर्गा मातेची आराधना करण्यास हा सण समर्पित आहे. नवरात्री हे सुष्टाच्या दुष्टावरील विजयाचे प्रतीक आहे. भारतीय लोकांच्या मनात या सणाचे विशेष स्थान असते. नवरात्रीचा आनंद साजरा करताना सोनी सबचे कलाकार या सणाशी संबंधित सुंदर आठवणींना उजाळा देत आहेत आणि आपल्या वैयक्तिक आठवणी शेअर करत आहेत. आपल्या परिवारासोबत उपवास करण्यापासून ते गरब्याच्या रात्री जागवण्यापर्यंतच्या या आठवणींमधून या सणाची भावना साकारते आणि आपल्या परांपरेशी आपले घट्ट नाते असल्याचा अनुभव या कलाकारांना येतो.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते, “नवरात्रीचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. माझी आई देवीची पूजा करते आणि मी देखील लहानपणापासून देवीची भक्त आहे. आईसोबत उपवास करणे आणि कुमारिका भोजन घालणे या माझ्यासाठी फार गोड आठवणी आहेत. यावर्षी ‘पुष्पा इम्पॉसिबल’च्या शूटिंगमुळे मला माझ्या मित्रमंडळींसोबत गरबा करायला जाणे जमणार नाही. मात्र नवरात्रीची सकारात्मक ऊर्जा आणि देवीवरील माझी श्रद्धा यामुळे हा सण नेहमीच अविस्मरणीय ठरतो.”
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरी शर्माची भूमिका करणारी आशी सिंह म्हणते, “माझ्यासाठी नवरात्री हा पहिल्यापासून एक विशेष सण आहे. माझ्या मते हे नऊ दिवस केवळ जल्लोषाने भरलेले नसतात, तर या काळात भक्ती, शिस्त आणि आंतरिक शक्तीचा देखील संचार असतो. गरबा आणि दांडियामुळे वातावरण सळसळत असते! लहानपणी रंगीबेरंगी चणिया-चोळी घालून तयार होऊन माझ्या मैत्रिणींसोबत गरबा करण्याचा मला कोण उत्साह असायचा! आजही माझे शूटिंगचे वेळापत्रक धकाधकीचे असले तरीही मला संधी मिळाली तर मी गरब्याचा आनंद नक्कीच घेईन.”
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत लताची भूमिका करणारी रिद्धिमा पंडित म्हणते, “माझ्यासाठी नवरात्री म्हणजे भक्ती आणि सकारात्मकता. मला आठवते आहे, लहानपणी मी माझ्या आईला देवीसाठी नैवेद्य बनवण्यास मदत करत असे. या पूजेच्या निमित्ताने आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र यायचो आणि सण साजरा करायचो. मला या सणाबद्दल सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट हीच आहे की, हा सण नृत्य, संगीत आणि पूजा या निमित्ताने सर्वांना एकत्र आणतो आणि सर्व जण मिळून जणू एक मोठे कुटुंब होते! माझ्यासाठी नवरात्रीचा अर्थ अंतर्मुख होऊन दुर्गा देवीची शक्ती आणि तिचे माहात्म्य अनुभवण्याचा आहे. दरवर्षी, देवीचा पराक्रम आणि सकारात्मकता माझ्या आयुष्यात बिंबवण्याचा माझा प्रयत्न असतो. मी आवर्जून पंडालमध्ये जाऊन आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेते. गरबा आणि दांडियामुळे आसपासचे वातावरण इतके चैतन्यमय होते, ते मला फार आवडते.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत नंदिताची भूमिका करणारी गौरी टोंक म्हणते, “मी ठाण्यात राहते आणि नवरात्रीदरम्यान आमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये देवीची मूर्ती स्थापित होते आणि दररोज तिची पूजा करण्यात येते. मला पहिल्यापासून पूजा-अर्चना आणि सण-उत्सवांमध्ये खूप स्वारस्य आहे, ज्यामुळे लोक तर मला पूजारीच म्हणतात. लोकांना भेटणे, त्यांच्यासोबत पूजा, आरती करणे यामुळे जी ऊर्जा उत्पन्न होते, ती मला फार आवडते. लहान असताना मी देवीच्या मूर्तीपुढे उभी राहून तिची अर्चना आणि गरबा करत असे. आज मी माझ्या मुलांना माझ्या सोबत पंडालमध्ये घेऊन जाते आणि दर्शनाचा अनुभव त्यांनाही मिळेल याची खातरजमा करते. कामात कितीही गुंतलेले असले तरी यासाठी मी आवर्जून वेळ काढते, कारण नवरात्री वर्षातून एकदाच येते. आम्ही गरबा आणि दांडिया खेळून या सोहळ्याचे समापन करतो. काय सुंदर अनुभव असतो तो!”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “खरं सांगायचं तर मुंबईत आल्यानंतरच मला नवरात्रीची भव्यता अनुभवता आली. लहानपणी माझ्यासाठी नवरात्रीचा अर्थ स्थापना पूजा आणि उपवास इतकाच होता, पण मुंबईत आल्यावर मी रंग, खाद्यपदार्थ, गरबा आणि एकंदर सणाचा जल्लोष अनुभवला. मला वेळ मिळतो तेव्हा छान तयार झालेले लोक, सुंदर सजावट आणि गरब्याची ऊर्जा अनुभवायला मी अवश्य बाहेर पडतो. नवरात्रीत वातावरण नेहमी चैतन्यमय, आल्हादक आणि भारलेले असते. हीच नवरात्रीतील माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे.”