no images were found
इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार
कुर्चोरेम: देशातील वेगाने वाढणाऱ्या सुवर्णकर्ज देणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या ‘इंडेल मनी’ने गोव्यातील कुर्चोरेम येथे आपली पहिली शाखा सुरू केली आहे. बुधवारी (२२ जुलै) या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत आणखी पाच शाखा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.गोव्यातील नव्या शाखेत ग्राहकांना कमी कागदपत्रे, तत्काळ कर्ज प्रक्रिया, जलद कर्जवितरण, डिजिटल ऑनबोर्डिंग आणि घरपोच सेवा यांसह सुवर्णकर्जाशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय, कंपनी लवकरच म्हापसा, फोंडा, डिचोली, मडगाव आणि वास्को येथेही नवीन शाखा सुरू करणार आहे.या विस्ताराबाबत बोलताना ‘इंडेल मनी’चे कार्यकारी संचालक आणि सीईओ उमेश मोहनन म्हणाले, की गोव्यातील विस्तार हा आमच्या विकास धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गोव्याची स्थानिक अर्थव्यवस्था आणि उद्योजकता झपाट्याने विकसित होत आहे. येथे मजबूत उपस्थिती निर्माण केल्यामुळे स्थानिक नागरिकांना सुलभ सुवर्णकर्ज सुविधा उपलब्ध करून देता येतील. तसेच, राज्यातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या गरजांसाठी आमच्या विशेष परकीय चलन (फॉरेक्स) सेवाही प्रभावीपणे देता येतील.