Home सामाजिक आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

29 second read
0
0
5

no images were found

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

गोकुळचा स्वच्छतेचा संदेश; जनजागृती फलकांनी वेधले लक्ष

कोल्हापूर,(प्रतिनिधी): आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्यावतीने कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांना मोफत सुगंधी दूध आणि सार्थ हरीपाठ पुस्तिकांचे वाटप पुईखडी येथील रिंगण सोहळा परिसरात करण्यात आले. वारकऱ्यांची सेवा करण्याबरोबरच स्वच्छतेचा संदेश देण्याचाही उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

          यावेळी गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वारकऱ्यांना सुगंधी दूध, हरीपाठ पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

          “आपली दिंडी – स्वच्छ दिंडी”, “एक पाऊल भक्तीकडे… एक पाऊल स्वच्छतेकडे”, “दूध पिऊया… पिशवी कचरापेटीत टाकूया”, “माऊलींची वारी, स्वच्छतेची जबाबदारी” असे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक गोकुळ तर्फे रिंगण सोहळा परिसरात लावण्यात आले होते.

          विशेष म्हणजे, दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गोकुळच्या १५ स्वयंसेवकांनी यांनी दूध वाटप करण्यात आलेल्या परिसरातील रिकाम्या दुधाच्या पिशव्या व इतर कचरा गोळा करून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेचा संदेश केवळ फलकांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीतूनही गोकुळने सामाजिक बांधिलकी जपली. वारकरी सेवा, स्वच्छतेची जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणारा गोकुळचा हा उपक्रम उपस्थित वारकरी व नागरिकांच्या पसंतीस उतरला.

          या कार्यक्रमप्रसंगी संघाचे डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, प्रविण देसाई, संतोष पाटील, प्रमोद घोडके, उल्हास पाटील, वसंत माळवी, संघाचे मार्केटिंग विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महिला मदतनीस आदि मान्यवर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार  कुर्चोरेम: देशातील वेगाने वाढणाऱ्या सुवर्णकर्ज …