no images were found
शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मला याबाबतची काहीही कल्पना नव्हती. :- मंत्री छगन भुजबळ
नाशिक :- शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मला याबाबतची काहीही कल्पना नव्हती. तेव्हा त्यांना मी मनवलं. पण तेव्हा त्यांनी ऐकले नाही. पण पुढे काहीच दिवसात त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं.
मी राजीनामा देतो. दुसऱ्या क्रमांकाच्या पदावरून तिसऱ्या क्रमांकाचं पद मी घेणार नाही. असं म्हणाले असता मी त्यांना समजावलं तुम्ही आणि सुप्रिया दोघे कार्याध्यक्ष व्हा.
पुढे ते म्हणाले, जेव्हा सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. तेव्हा आम्हा सगळ्या नेत्यांना तो निर्णय कलाविनायत आला. तेव्हा प्रफुल्ल पटेल नाराज झाले.
प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते, पण त्यांना आपण रोखल्याचे भुजबळांनी सांगितले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा नेमकं काय घडले त्याबद्दल भुजबळ यांनी मोठे खुलासे केले आहे.