Home धार्मिक श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई

11 second read
0
0
40

no images were found

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई

 

कोल्हापूर, : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा येथे दिनांक 30 ते 31 जुलै 2025 अखेर श्री क्षेत्र चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा संपन्न होत आहे. श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी. ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर मार्गावरील दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी. बस स्थानक रोड ते जुने एस.टी. स्टँड रोड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदीर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानच्या मार्गावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1) (क) प्रमाणे सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई केली आहे.

       या कालावधीत महाराष्ट्र व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर ये-जा करीत असतात. जोतिबा डोंगरावर येणा-या मोटार वाहनांची प्रचंड संख्या, वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटार वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची कोंडी, समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत, सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. याकरीता यात्रा काळात वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे मोटार वाहनांची रहदारी आणि यात्रा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी रहदारीचे नियमन करणे आवश्यक आहे.

       दिनांक 30 जुलै 2025 रोजीचे 00.01 वा. पासून ते दिनांक 31 जुलै 2025 रोजी यात्रा संपेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…