
no images were found
भारताची अनोखी पण वैविध्यपूर्ण प्रतिभा साजरी करण्यासाठी येत आहे इंडियाज गॉट टॅलेंटचे 10वे सत्र
देशाच्या काना-कोपऱ्यातून छुपी प्रतिभा शोधून काढण्याबद्दल ओळखला जाणारा मंच इंडियाज गॉट टॅलेंट आपले 10 वे सत्र घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांसाठी अद्भुत प्रतिभा आणि नेत्रदीपक परफॉर्मन्स घेऊन परतत आहे. इंडियाज गॉट टॅलेंट ही फ्रेमॅन्टल इंडियाची निर्मिती आहे, जी रियालिटी शोजमध्ये नैपुण्य असलेली एक आघाडीची प्रॉडक्शन कंपनी आहे.
भारतातील असामान्य आणि वैभवसंपन्न प्रतिभेने देश-विदेशात आपला ठसा उमटवला आहे. आता हीच ‘विजयी विश्व हुनर हमारा’ ही भावना घेऊन हा शो येत आहे, ज्यामध्ये असामान्य ‘हुनर’वर प्रकाशझोत असेल! सच्च्या परफॉर्मरची पारख करणारी नजर असलेली किरण खेर, लावण्यवती शिल्पा शेट्टी आणि मस्त स्वभावाचा बादशाह पुन्हा एकदा या शोमध्ये परीक्षणाचे काम करणार आहेत. एकमेकांशी उत्तम सख्य असलेले हे परीक्षक गोल्डन बझर दाबून स्पर्धकांना पुढील फेरीत पाठवतील. शॅडो पपेट्रीपासून ते माइंड रीडिंग, पत्त्यांचे जादूगार, भारतीय शास्त्रीय नर्तक ते नावीन्यपूर्ण ड्रोन अॅक्ट करणाऱ्यांपर्यंत इंडियाज गॉट टॅलेंट 10 मध्ये सगळ्या कलाकारांचा समावेश आहे, जे सर्व परीक्षक आणि प्रेक्षकांचे नक्कीच रंजन करतील. फ्रेमॅन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. द्वारा निर्मित आणि अर्जुन बिजलाणीच्या सूत्रसंचालनात इंडियाज गॉट टॅलेंटचे 10 वे सत्र 29 जुलै 2023 पासून देशात खळबळ माजवण्यास येत आहे. हा शो दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित करण्यात येईल.
एकामागून एक प्रत्येक सीझनमध्ये इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचाने अनेक प्रज्ञावंत कलाकारांना प्रसिद्धी आणि यशाचा मार्ग खुला करून दिला आहे. मागील सत्राचे विजेते बीट बॉक्सर आणि बासरीवादक जोडी दिव्यांश आणि मनुराज तसेच अंतिम फेरीत पोहोचलेलावॉरियर स्क्वॉड डान्स ग्रुप आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले होते आणि आपली प्रतिभा त्यांनी प्रतिष्ठित मंच- अमेरिकाज गॉट टॅलेंट – ऑल स्टार्स एडिशनमध्ये सादर केली आणि जागतिक मंचावर भारताचे नाव रोशन केले. या वर्षी स्पर्धेचा दर्जा आणखीन उंचावण्यासाठी 95-वर्षीय शॉट पुटर भगवानी देवी (नवी दिल्ली), नागालँडचा 15thNAPIR बॅन्ड, कोलकाताचा इन्सपायरिंग डान्स फॅमिली ग्रुप (एरियल डान्स ग्रुप), केरळहून आलेला नवरसम, मुंबईचा एक क्लासिकल फ्यूजन म्युझिक ग्रुप – राग फ्यूजन आणि इतर अनेक स्पर्धक वेगवेगळ्या कला सादर करून हा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातील काही स्पर्धक तर आपली प्रतिभा आणि जिद्द यांच्या बळावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडून नवीन विक्रम स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा बहुरंगी, बहुढंगी कलाकारांमुळे इंडियाज गॉट टॅलेंटचे 10 वे सत्र दुमदुमणार आहे!
को-प्रेझेंटेड बाय टेक्नो स्मार्टफोन्स आणि को-पॉवर्ड बाय डेनवर डिओडोरन्ट, हीरो मोटोकॉर्पची विडा इलेक्ट्रिक स्कूटर, पार्ले क्रॅकजॅक, गो चीज – इंडियाज गॉट टॅलेंटच्या 10 व्या सत्राचे असोशिएट स्पॉन्सर आहेत निरमा लिमिटेड आणि HDFC लाईफ.