
no images were found
कोल्हापूर जिल्हा ज्युनियर (१९ वर्षाखालील) मुला मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर(प्रतिनिधी ) :- ‘चंदवाणी हॉल’ ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा ज्युनियर (19 वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.मुलांच्या गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीने झाली अंतिम पाचव्या फेरीत अग्रमानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने द्वितीय मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरचा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले तर ऋषिकेशला चार गुणासह उपविजेतेपद मिळाले. दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित कोल्हापूरच्या व्यंकटेश खाडे पाटीलने आठवा मानांकित कोल्हापूरच्या अपूर्व कदम वर विजय मिळविला. तिसऱ्या पटावर चौथा मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील ने बारावा मानांकित कोल्हापूरच्या राजदीप पाटील वर मात केली तर चौथ्या पटावर सहावा मानांकित कोल्हापूरचा मानस महाडेश्वरने बिगर मानांकित कोल्हापूरच्या सिद्धार्थ चौगुले चा पराभव केला. पाचव्या पटावर अकरावा मानांकित कोल्हापूरच्या नारायण पाटील ने बिगर मानांकित कोल्हापूरच्या शशांक वाघमारे वर मात केली. समान चार गुण झाले मुळे सरस टायब्रेक गुणांनुसार शंतनू पाटील चा तिसरा क्रमांक, व्यंकटेश खाडे पाटीलचा चौथा क्रमांक, मानस महाडेश्वरचा पाचवा तर नारायण पाटीलचा सहावा क्रमांक आला.
मुलींच्या गटातील स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने झाली अंतिम पाचव्या फेरीत अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने अपेक्षेप्रमाणे बिगर मानांकित ग्रीष्मी पवारचा पराभव करून साडेचार गुणासह अजिंक्यपद पटकावले.द्वितीय मानांकित दिशा पाटील तृतीय मानांकित कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकर वर मात करीत साडेचार गुणासह उपविजेतेपद मिळविले तर शर्वरीला तीन गुणासह तृतीय स्थान मिळाले.चौथी मानांकित कोल्हापूरच्या अरीना मोदीने बिगरमानांकित कोल्हापूरच्या मन्नत पमनाणी वर विजय मिळवत दोन गुणासह चौथे स्थान मिळवले.ग्रीष्मी पवार व मन्नत पमनाणी यांचा अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक आला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ एडवोकेट निखिल पवार,एडवोकेट प्रिया पवार व मनोज महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारूलकर,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे,आरती मोदी व महेश व्यापारी उपस्थित होते.