no images were found
“मुक्काम पोस्ट परदेशवारी”पुस्तक वाचकांना जगभ्रमंती करून आणते- प्रसाद कुलकर्णी
इचलकरंजी (प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनी एका लेखिकेचे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा अभिमान वाटतो. प्रवास वर्णनात एक वेगळचं जग सामावून असते ते लेखकाच्या दृष्टीकोनातून जगासमोर येते असेच सहज, सोप्या शब्दात डॉ. शैलजा चनगुंडी यांनी त्यांच्या प्रवासवर्णनावर आधारित “मुक्काम पोस्ट परदेशवारी”पुस्तकात वाचकांना जगभ्रमंती करून आणतात. हा अनुभव व आठवणींचा ताळमेळ साधत जागतिक स्थळांबरोबर परदेशातील निसर्ग व मानवी स्वभावाचे दर्शन घडविणारे पुस्तक असल्याचे मत साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
डॉ. शैलजा चनगुंडी लिखित “मुक्काम पोस्ट परदेशवारी” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. समाजवादी प्रबोधिनी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे ॲड. स्वानंद कुलकर्णी, प्रकाशक दादासाहेब जगदाळे, ॲड. अर्जुन चनगुंडी आदि मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत लेखिका डॉ. शैलजा चनगुंडी यांनी केले. डॉ. चनगुंडी आपल्या मनोगतात म्हणाल्या परदेशात निसर्गाचे चक्र जितके विचित्र आहे तितके मानवी प्रवृत्ती पण भिन्न आहेत. त्याचे दर्शन मनावर परिणाम करणारे होते. त्यातूनच लिखाणाची प्रेरणा मिळाली. आणि मी लिहिती झाले.परदेशासह भारतात केलेला प्रवास मला नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा ठरला. रिटायरमेंट नंतर प्रवास व लेखन माझी शक्तिस्थाने बनली आणि त्यातूनच मुक्काम पोस्ट परदेशवारी पुस्तकाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे ॲड. स्वानंद कुलकर्णी यांनी मराठी साहित्य क्षेत्रात प्रवास वर्णनाचे महत्त्वाचे स्थान असून वाचकांना ते नेहमी भावत आलयं. प्राध्यापिका ते साहित्यिक हा शैलजा चनगुंडी यांचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेले भटकंतीचे वर्णन अप्रतिम आहे. ते फक्त स्थळ दर्शन नसून मानवी स्वभावांचे आकलन करून देणारे लेखन आहे. या पुस्तकाचे स्वागत वाचक नक्कीच करतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रकाशक दादासाहेब जगदाळे,बसवराज कोटगी,
श्रीमती लीलावती शिवलिंग वडेर, ॲड. अर्जुन चनगुंडी, डॅा. ज्योत्स्ना विजयकुमार वडेर, हेमांगी सुमंत वडेर यांनी मनोगत व्यक्त करून पुस्तक प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रा. संगीता पाटील आणि रोहित शिंगे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार अनुजा प्रसाद दरीबे यांनी मानले.
कार्यक्रमास पाटलोबा पाटील, दस्तगीर नदाफ, राजन मुठाणे,अजय व्हनुगरे, पुरुषोत्तम परीट, अमर पाटील, सुजीत शेख, भास्कर गेजगे,जावेद मुल्ला, गजानन खोत, पुजा चिमटे, स्नेहा भोंगाळे, वृषाली मिणचेकर, श्रीमती आक्काताई रामगोंडा कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम, डाॅ. सौ. उर्मिला खोत, विवेकानंद कॅालेजचे प्राचार्य सी. बी. पाटील आणि प्रा. सौ. पाटील मॅडम, प्रा सौ. मोरे मॅडम, प्रा. बी. एस्. पाटील, प्रा. व्ही. बी. पाटील, प्रा. एम्. एम्. कांबळे, श्री. गौतम कर्णिक, श्री. शेख सर आणि विद्यार्थी वर्ग यांच्यासह डॉ. शिरीष चनगुंडी, डॅा. सौ. अन्नपूर्णा चनगुंडी, सौ. उर्मिला पाटील, प्रा. रावसाहेब पाटील,सुमंत शिवलिंग वडेर आणि प्रा. हेमांगी सुमंत वडेर उपस्थित होते