Home सामाजिक वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

30 second read
0
0
11

no images were found

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्मलवारी-समृद्धवारी व चरणसेवा‘ उपक्रमाचा समारोप

पंढरपूर, : चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी आपल्या आई वडिलांप्रमाणे भक्तीभावाने थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा केली आणि त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारताच्या युवा शक्तीचे चित्र, भारत आणि महाराष्ट्र धर्म पाहायला मिळतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

     पंचायत समिती, पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे आयोजित ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

     मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सारख्या पुरोगामी आणि भक्ती मार्गाची समृद्ध परंपरा असलेल्या या राज्यात वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने २०१६ पासून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा निर्मल वारी उपक्रम सुरु केला आणि २०१७ पासून राज्याच्या अर्थसंकल्पात आणून जिल्हा प्रशासन आणि सहयोग संस्था  माध्यमातून वारी निर्मल वारी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शौचालय, स्नानगृह, स्वच्छता आदी व्यवस्था सुविधा सुरु केल्या.  वारकऱ्यामध्ये विठू माऊली असल्याने त्याची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य मानून या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. 

      मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत इतर दिंड्याकरिता शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. वारी दरम्यान १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर करण्यात आले. ५ हजार फिरती शौचालये देण्यात आली. वारीला निर्मलवारी करणारे स्वच्छतादूत हे देवदूतच आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यात वारीच्या अनुषंगाने अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले असून याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

    पंढरपूर येथील वाळवंट स्वच्छ करुन चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ करण्याच्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ३० ते ३५ लाख वारकरी पंढरपूर येथे आल्यानंतरही संपूर्ण पंढरपूर स्वच्छ दिसत आहे. वारीचा कालावधी संपल्यानंतरही पंढरपूर असेच स्वच्छ राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

     मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकप्रतिनिधी, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, निर्मलवारीमध्ये विविध परंपरांच्या माध्यमातून जनजागृती करणारे कलावंत तसेच वारी यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या कामाचे कौतुक केले.

     पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, वारीमध्ये वारकऱ्यांना सुविधा देताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. चरणसेवा उपक्रमासोबतच मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये, हिरकणी कक्ष, रुग्णालय, शौचालय, स्नानगृह, जर्मन हँगर, मोबाईल चार्जिंग वाहन आदी उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यांना हक्काच्या मुक्कामाचे ठिकाण उपलब्ध करुन देण्यात आल्याबद्दल वारकरी समाधान व्यक्त करीत होते. यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सेवा भावी संस्था, स्वच्छता दूत, नागरिक यांनी मनापासून योगदान दिले.

     २०१७स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जबाबदारी न समजता सेवा म्हणून कार्य केले. यामुळे ही संपूर्ण वारी साथीच्या रोगापासून मुक्त झाली आहे, वाळवंट व चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यात आली असून एकूणच संपूर्ण पंढरी स्वच्छ करुन वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आली आहे. आषाढीवारीमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होवून राज्य शासनाच्या सर्व सेवांचा लाभ घेतला आहे, असेही गोरे म्हणाले.

    आषाढीवारीमध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी  उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. सातारा, सोलापूर जिल्ह्यात १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर, ७ लाख ८० चौरस फूट जलरोधक मंडप उभारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ भारत मोहिमेत महाराष्ट्र प्रथम स्थानी आल्याबद्दल संचालक शेखर रौंदळ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर व सेवाभावी संस्था आणि आषाढी वारीतील स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६’ बोधचिन्हाचे अनावरणही याप्रसंगी करण्यात आले.

    कार्यक्रमात ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचे माहितीपट दाखविण्यात आले. कार्यक्रमाला आमदार राजेंद्र राऊत, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, नारायण पाटील, नंदकिशोर महाजन, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप गोकुळचा स्वच…