Home Uncategorized पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहन

पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहन

0 second read
0
0
5

no images were found

पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहन

कोल्हापूर, : शहरातील पंचगंगा, कदमवाडी, कसबा बावडा व बापट कॅम्प येथील चारही स्मशानभूमींमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना मोफत अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी पंचगंगा स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होत असल्याने येथे उपलब्ध असलेल्या बेडचा ताण वाढत आहे. पंचगंगा स्मशानभूमीत सध्या ३३ अंत्यविधी बेड उपलब्ध आहेत. अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांकडून रक्षा विसर्जन करण्यास विलंब होत असल्याने अनेकदा दहन बेडवर रक्षा शिल्लक राहते. प्रामुख्याने बुधवार व रविवार या दिवशी रक्षा विसर्जन केले जात असल्याने इतर दिवशी संबंधित बेड उपलब्ध होत नाहीत. परिणामी त्या बेडवर पुढील अंत्यविधी करणे शक्य होत नसल्याने उपलब्ध बेडची संख्या कमी पडते. यामुळे पंचगंगा स्मशानभूमीत बेड उपलब्ध नसल्यास अंत्यविधीसाठी आलेले पार्थिव महापालिकेच्या अन्य स्मशानभूमीकडे पाठवावे लागते. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता, अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रक्षाविसर्जन करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल

महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल : प्र…