Home सामाजिक पंचगंगा रुग्णालयात नवीन सोनोग्राफी सेंटर सुरू

पंचगंगा रुग्णालयात नवीन सोनोग्राफी सेंटर सुरू

1 min read
0
0
3

no images were found

पंचगंगा रुग्णालयात नवीन सोनोग्राफी सेंटर सुरू : गरोदर माता  रुग्णांना माफक दरात सोनोग्राफी तपासणीची सुविधा

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा रुग्णालयामध्ये नवीन सोनोग्राफी सेंटरचा उद्घाटन शुभारंभ आज करण्यात आला. या सेंटरमुळे शहरासह ग्रामीण भागातील गरोदर माता तसेच रुग्णांना अत्यल्प व माफक दरात सोनोग्राफी तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

            महानगरपालिकेच्या आरोग्य समिती सभापती सौ. सुरेखा ओटवकर, शिक्षण समिती सभापती सौ. शिला सोनुले, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, नगरसेविका सौ. माधवी गवंडी व सौ. दीपा काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनोग्राफी सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.

            यावेळी उपआयुक्त किरणकुमार धनवाडे म्हणाले की महानगरपालिकेच्या पंचगंगा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा शहरातील तसेच ग्रामीण भागातील गरोदर माता व रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यल्प व माफक दरात सोनोग्राफी तपासणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

        नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमार्फत नागरिकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना या सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ होत असून पंचगंगा रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

            या कार्यक्रमाची प्रस्तावना आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केली. सूत्रसंचालन एन.यू.एच.एम. नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने यांनी केले. यावेळी अत्यल्प दरात सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान देणारे रेडिओलॉजिस्ट डॉ.विजय पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            प्रशासन वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे (हेरवाडे) यांनी पंचगंगा रुग्णालयामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा-सुविधांची माहिती दिली. तसेच रुग्णालयाच्या कामकाजासाठी पदाधिकारी व नगरसेवकांकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

            या कार्यक्रमास पंचगंगा रुग्णालयातील तसेच आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…