Home सामाजिक प्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शन

प्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शन

1 min read
0
0
5

no images were found

प्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शन : महापालिकाप्रदूषण नियंत्रण मंडळ व चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

 कोल्हापूर, : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लास्टिक बंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच व्यापारी व व्यावसायिकांमध्ये नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक बंदी नियमावली व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.

            कार्यशाळेच्या प्रारंभी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहित मातकर यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

            कार्यशाळेत प्रतिबंधित प्लास्टिक, प्लास्टिक बंदी नियमावली, नियमांचे उल्लंघन झाल्यास करण्यात येणारी कार्यवाही, व्यापारी व नागरिकांची जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढविणे, शासनाच्या नियमांचे पालन करणे तसेच प्लास्टिक प्रदूषणामुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

महापालिकेचे सिटी कॉर्डिनेटर मेघराज चडचणकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी नियमावली तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ याबाबत सविस्तर माहिती दिली.

            शहरातील विविध व्यापारी व व्यावसायिक क्षेत्रातील सुमारे ७३ व्यापारी व व्यावसायिकांनी कार्यशाळेस उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्लास्टिक बंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याबाबत उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

            कार्यशाळेदरम्यान प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात आले. व्यापारी, उद्योजक व संबंधित घटकांनी प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

            यावेळी महापालिकेचे NDS (Nuisance Detection Squad – उपद्रव शोध पथक) देखील उपस्थित होते. प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणाऱ्या बाबी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत पथकाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी NDS पथकामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मानद सचिव प्रशांत शिंदे यांनी केले, तर उपाध्यक्ष राजू पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक   पर्यायांचा स्वीकार करणे आणि नागरिक, व्यापारी व उद्योजकांनी सामूहिकपणे पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात टर्म प्लॅन व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के वाढ

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रा…