Home विमा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात टर्म प्लॅन व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के वाढ

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात टर्म प्लॅन व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के वाढ

1 min read
0
0
7

no images were found

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात टर्म प्लॅन व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के वाढ

  • ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी एआय आणि डेटा अॅनालिटिक्सचा प्रभावी वापर
  • ३१ मार्च २०२६ पर्यंत महाराष्ट्रात एकूण विमा संरक्षण रक्कम ४,९४,२०३ कोटी रूपयांवर
  • ३१ मार्च २०२६ पर्यंत राज्यात ११,३१० भागीदार शाखा, १३,९७४ स्पेसिफाइड पर्सन आणि २८,२४४ सल्लागारांचे विस्तृत जाळे

सप्टेंबर : कंपनीने महाराष्ट्रात आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत टर्म प्लॅन (रिटेल प्रोटेक्शन) व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के प्रबळ वाढ नोंदवली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीने राज्यातील ३१,९२,१०८ व्यक्तींना विमा संरक्षण दिले आहे. कंपनीला महाराष्ट्र राज्यात लिंक केलेल्या, नॉन-लिंक केलेल्या आणि अॅन्युइटी व्यवसायाचा समावेश असलेल्या बचत व्यवसायातही मोठी मागणी मिळत आहे.

३१ मार्च २०२६ पर्यंत राज्यातील कंपनीचे व्यवस्थापनाखालील मालमत्ता मूल्य (एयूएम) ५२,३०३ कोटी रूपये होते. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीने ३१ मार्च २०२६ पर्यंत राज्यात ४,९४,२०३ कोटी रूपयांच्या सम अॅश्युअर्डची (विमा संरक्षण रक्कम) नोंद केली आहे आणि गेल्या ७ वर्षांत कंपनीने महाराष्ट्र राज्यातील आपल्या ग्राहकांना एकूण १५,६५५ कोटी रूपये मूल्याचे लाभ अदा केले आहेत.

संचालक मंडळाने नुकतेच संबंधित मंजुऱ्यांच्या अधीन राहून कंपनीचे नाव बदलून ‘आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेड’ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत, महाराष्ट्रात कंपनीच्या ४५ शाखा आणि २८,२४४ सल्लागार, तसेच ११,३१० भागीदार शाखा आणि १३,९७४ स्पेसिफाइड पर्सन आहेत.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री. अमिष बँकर म्हणाले, “महाराष्ट्र आमच्या कंपनीसाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे बाजारपेठ राहिली आहे आणि आम्हाला राज्यातील शहरी व नव्याने विकसित होणाऱ्या दोन्ही केंद्रांमध्ये चांगली गती दिसून येत आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये, ग्राहकांच्या वर्तनात एक स्पष्ट बदल दिसला आहे; जिथे लोक त्यांच्या एकूण आर्थिक ध्येयांचा भाग म्हणून आर्थिक संरक्षण, दीर्घकालीन बचत आणि निवृत्तीचे नियोजन यांना वाढते प्राधान्य देत आहेत. आमचे वितरण जाळे, डिजिटल क्षमता, वैविध्यपूर्ण उत्पादने आणि ग्राहक प्रतिबद्धतेमधील सातत्यपूर्ण गुंतवणूक आम्हाला या क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक वाढवण्यास मदत करत आहे.

ग्राहकांसाठी त्यांच्या भविष्याचे नियोजन करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत सोपे करणे हे आमच्या कंपनीचे धोरण आहे. आमचे सर्व प्रयत्न याच दिशेने केंद्रित आहेत.

एकंदरीत, आमची कंपनी ग्राहकांच्या संपूर्ण जीवनचक्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटायझेशनचा वापर करते. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान, एकूण कंपनी पातळीवर, आमच्या बचत पॉलिसींपैकी अंदाजे ५४ टक्‍के पॉलिसी एकाच दिवशी जारी करण्यात आल्या, आणि आमच्या सुमारे ५८ टक्‍के इन्शुरन्स पॉलिसी डिजिटल केवायसीचा वापर करून जारी करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे, आमच्या ९७ टक्‍के सेवा सेल्फ-हेल्प किंवा डिजिटल मोडद्वारे पुरवल्या जातात, ज्यामुळे आमचे ग्राहक काही क्लिक्समध्ये त्यांच्या पॉलिसी सहजपणे व्यवस्थापित करू शकतात.

शिवाय, आम्ही उद्योगातील पहिला वहिला डिजिटल प्लॅटफॉर्म – आयसीआयसीआय प्रू पार्टनर स्टॅक लाँच केला आहे, जो डिजिटल टूल्स आणि अॅनालिटिक्सचा मेळ घालणारा आपल्या प्रकारचा पहिलाच क्षमतांचा संच आहे.

याव्यतिरिक्त, आमचा अॅडव्हायझर स्टॅक – आयपीआरयू एज देशभरातील २.४४ लाखांहून अधिक एजंट्सच्या आमच्या सल्लागार नेटवर्कला त्यांचा व्यवसाय कार्यक्षमतेने वाढवण्यास, ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यास, एकाच दिवशी पॉलिसी जारी करण्यास आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यास सक्षम करतो. निवडक वितरकांना एकाच दिवशी कमिशन देणारी आम्ही पहिली कंपनी आहोत. महत्त्वाचे म्हणजे, नवीन वितरण भागीदाराला २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत ऑनबोर्ड केले जाते.

याशिवाय, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीमधील आमचा ९९.३ टक्‍के क्लेम सेटलमेंट रेशो आणि तपासणी न करावयाच्या वैयक्तिक दाव्यांसाठी एकूण कंपनी पातळीवर अवघ्या १ दिवसाचा सरासरी टर्नअराउंड टाईम हा आमचे ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला दर्शवतो. आमची दावा निवारण प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. दाव्याची विनंती कंपनीची वेबसाइट, ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअॅप, शाखेला भेट देऊन किंवा आमच्या २४X७ ग्राहक सहाय्याद्वारे सहज सबमिट केली जाऊ शकते. शिवाय, एकूण कंपनी पातळीवर आमचा अर्ली क्लेम्स रेशो २२ टक्‍के हा उद्योगात सर्वोत्कृष्ट आहे, जो गेल्या काही वर्षांत मिळालेल्या गुणवत्तेच्या व्यवसायावर आमचे लक्ष अधोरेखित करतो. विशेष म्हणजे, ३१ मार्च २०२६ पर्यंत गेल्या ७ वर्षांत आमच्या कंपनीने महाराष्ट्रात डेथ क्लेम्स (मृत्यूचे दावे) म्हणून ५,१०८ कोटी रूपये दिले आहेत.

महाराष्ट्र दीर्घकालीन मोठ्या संधी प्रदान करतो आणि आम्ही आमची पोहोच विस्तारण्यासाठी, सुलभता सुधारण्यासाठी आणि राज्यभरातील ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

देशातील सर्वात ग्राहक-स्नेही आणि भागीदार-योग्य विमा कंपनी बनण्याच्या कंपनीच्या धोरणाला अनुसरून, कंपनी विम्याची पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी वितरणाचा विस्तार करत आहे व तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

आपल्या धोरणाचा भाग म्हणून, कंपनी शाखा विस्तार, सल्लागारांची भरती आणि लक्षित ग्राहक संपर्क उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ करण्याची योजना आखत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

प्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शन

प्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शन : महापालिका, प्…