Home Uncategorized कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

25 second read
0
0
4

no images were found

कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मूल्यांकनात 90.18 टक्के गुण; कोल्हापूर परिमंडळातील दुसरे केंद्र

कोल्हापूर, : शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमधील आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कसबा बावडा येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. 5 ने राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनात 90.18 टक्के गुण मिळवत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कोल्हापूर परिमंडळातील नागरी आरोग्य केंद्र प्रकारातील राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविणारे हे दुसरे केंद्र ठरले आहे.

            महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सन 2025-26 व 2026-27 या कालावधीत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या चेकलिस्टनुसार या कार्यक्रमात चार टप्प्यांमध्ये मूल्यांकन केले जाते. प्रथम संस्थास्तरावर स्वमूल्यांकन, त्यानंतर जिल्हास्तरावरील टीमकडून, राज्यस्तरीय टीमकडून आणि अखेरीस पात्र ठरलेल्या संस्थांचे राष्ट्रीय स्तरावरील टीममार्फत मूल्यांकन केले जाते.

            प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. 5, कसबा बावडा यांचे राज्यस्तरीय मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनासाठी पात्रता मिळाली होती. त्यानुसार 13 व 14 जुलै 2026 रोजी एन.एच.एस.आर.सी., दिल्ली येथील दोन सदस्यीय टीमने केंद्राची पाहणी व मूल्यांकन केले. गुजरात येथील डॉ. जैमिन पांडया आणि राजस्थान येथील डॉ. मनिष कुमार यांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाच्या चेकलिस्ट नुसार केंद्राचे मूल्यांकन केले. या मूल्यांकनामध्ये आरोग्य केंद्रातील 12 विभागांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये केंद्राला 90.18 टक्के गुण मिळाले. तसेच राष्ट्रीय प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली पाच मानांकने पूर्ण केल्याने केंद्रास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

            या यशासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरणकुमार धनवाडे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, आरसीएच ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडिक, शहर लेखा व्यवस्थापक प्रताप पाटील, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. संदीप पाटील, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक श्रीमती नेहा भोई, आरसीएच कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. 5 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पुलकीत खंबायते आणि सर्व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पाहिले. त्यांच्या समन्वयातून केंद्राने हे उल्लेखनीय यश संपादन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आयसीआयसीआय लाइफ पार्टनर स्टॅक 2.0’चे अनावरण

आयसीआयसीआय लाइफ पार्टनर स्टॅक 2.0’चे अनावरण · एआय सक्षम साधने सल्लागारांना उत्पादनांच्या श…