
no images were found
शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या गाडीला अपघात
जाधवाची स्कॉर्पिओ व i20ची समोरासमोर धडक
परभणी : या आधी अनेकदा राजकीय नेत्यांच्या गाड्यांचे अपघात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघातांचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला होता.
परभणीचे खासदार संजय जाधव याच्या गाडीला अपघात झाला. नवरात्रीच्या निमित्ताने ते एका बैठकीसाठी जात होते. यावेळी खासदार संजय जाधव यांच्या स्कॉर्पिओ गाडीची आणि एका आय-ट्वेन्टी कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातातून संजय जाधव अगदी थोडक्यात बचावलेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचं नुकसान झालंय.
नवरात्रीच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीसाठी खासदार संजय जाधव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. उद्धव ठाकरे यांच्या गटातील संजय जाधव हे खासदार आहेत. या अपघाताबाबत समजलेले माहित अशी कि, दोन्ही चालकांनी गाड्या नियंत्रित केल्या परंतु तरीही धडक त्यांना थांबवता आली नाही. अचूकवेळी ब्रेक लावल्यामुळे होणारा अनर्थ टळला. दोन्ही गाड्यांच्या बोनेटचे या अपघातामध्ये नुकसान झाले आहे. अपघातामुळे परिसरात काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. क्रेनच्या मदतीने स्कॉर्पिओ गाडी हटवण्यात आली. तातडीने पोलीस अपघातस्थळी पोहोचले.