
no images were found
विजयादशमीला ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटगृहात
समर्थ रामदासांनी दासबोधात एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’. शत्रूच्या बेसावधपणाचा फायदा करून घेण्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही.
शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर येतोय. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार-हृषिकेश परांजपे, संगीतकार- शशांक पोवार, संगीत- रोहित नागभिडे, पार्श्वसंगीत शशांक पोवार यांचे आहे.
या चित्रपटाचे निर्माते- डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे तर सहनिर्माते प्रफुल्ल तावरे, रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते, छायाचित्रण- संजय जाधव, संकलन- पीटर गुंड्रा यांचे व संवाद डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे. क्रिएटिव्ह कन्सल्टंट प्रशांत खेडेकर तर क्रिएटिव्ह सुपरवायझरची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक- महेश गुरुनाथ कुडाळकर, साहसदृश्ये- रवी दिवाण, वेशभूषा- मानसी अत्तरदे यांची, नृत्यदिग्दर्शन- दिपाली विचारे यांचे, रंगभूषा- राहुल सुरते, केशभूषा जयश्री नाईक यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन क्रिएटिंग पिक्चर्सचे आहे. विजयादशमीला शिवप्रताप गरुडझेप सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.