Home Uncategorized ATSने पीएफआयच्या अध्यक्षालाच औरंगाबादेत केली अटक

ATSने पीएफआयच्या अध्यक्षालाच औरंगाबादेत केली अटक

1 second read
0
0
337

no images were found

ATSने पीएफआयच्या अध्यक्षालाच औरंगाबादेत केली अटक
औरंगाबाद : ए.टी.एस पथकाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष शेख नासीर शेख साबेर उर्फ नदवी (वय -३७ रा.बायजीपुरा, औरंगाबाद) यास देश विरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
पथकाने पीएफआय या संघटनेच्या शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजलं सय्यद खालील, परवेज खान मुजमिल खान, अब्दुल हादी, अब्दुल रौफ अशा चार जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्राचा प्रमुख असलेल्या शेख याची पथकाकडून चौकशी सुरु होती. अखेर त्यास पोलिसांनी अटक केली. शेख विरोधात देश विरोधी कट रचल्याचा आरोप आहे.
आरोपीला ए.टी.एसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयिताला टेरर फंडिंग मिळाली आहे का? याची शहानिशा करणे आहे. त्याच बरोबर बँक खाती तपासणे आहे. कोणासोबत संपर्क आला आहे का? याची संपूर्ण तपासणी करायची असल्याने कोठडीची विनंती सरकारी वकिलाकडून करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपी शेखला नऊ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…