Home मनोरंजन अविनेश रेखी ने घेतले अष्टविनायकाचे दर्शन

अविनेश रेखी ने घेतले अष्टविनायकाचे दर्शन

8 second read
0
0
32

no images were found

अविनेश रेखी ने घेतले अष्टविनायकाचे दर्शन

      सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ या पौराणिक मालिकेत अष्टविनायकाचा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध प्रवास उलगडत आहे. शंकराची भूमिका करणाऱ्या अविनेश रेखीने अलीकडेच पाली आणि महाड या अष्टविनायकांपैकी दोन तीर्थस्थानांना भेट दिली आणि गणेशाच्या या दोन विशिष्ट रुपांची आध्यात्मिक संबद्धता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पाली अष्टविनायक मंदिरात, बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेताना अविनेशने अढळ भक्ती आणि बालसुलभ श्रद्धा याबाबत चिंतन केले. गणपतीचे हे रूप निखळ भक्तीचे प्रतीक आहे. अशी भक्ती जी वय, हुद्दा आणि परिस्थिती याच्या पलीकडे जाते. त्यानंतर तो महाड अष्टविनायक मंदिरात गेला. येथील वरदविनायक हा आशीर्वाद देणारा गणेश आहे. येथे देवाचा आशीर्वाद मिळवण्या अगोदर स्वतःच्या आतील सामर्थ्य शोधण्याच्या महत्त्वाबाबत त्याने चिंतन केले कारण वरदविनायक धाडस आणि सुजाणतेला प्रेरणा देतो.

        या पवित्र देवस्थानांना भेट दिल्यावर गणेशाच्या विविध रूपांविषयीची अविनेशची समज वाढली आणि आजच्या जगात त्याची कालातीत संबद्धता जाणवली. प्रत्येक अष्टविनायक मंदिर एक वेगळा आध्यात्मिक संदेश देते. एकत्रितपणे अष्टविनायक हा श्रद्धेचा प्रवास आहे, जो पिढ्यान् पिढ्या चालत आला आहे.या प्रवासाच्या लक्षणीयतेविषयी बोलताना अविनेश रेखी म्हणाला, “अष्टविनायकाच्या गोष्टी केवळ पौराणिक कथा नाहीत. तो श्रद्धा, संयम, जबाबदारी आणि संपूर्ण समर्पणाचा प्रवास आहे. महाड येथील वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर यांचे दर्शन घेण्याचा अनुभव विनम्र करणारा होता. या मंदिरांमध्ये अनेक पिढ्यांनी केलेल्या पूजा-अर्चनेची स्पंदने आहेत. या मालिकेत आम्ही अष्टविनायक कथा भारतीय सांस्कृतिक वारशाने जपलेल्या विशुद्धतेने आणि श्रद्धेने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रामाणिक कथाकथनाद्वारे प्रेक्षक या कालातीत कथांशी संबद्ध होऊ शकतील अशी आम्हाला आशा आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…