no images were found
सुंदर आठवणींपासून ते उत्सवी आनंदापर्यंत: सोनी सबचे कलाकार सांगत आहेत नाताळच्या जल्लोषाबद्दल
नाताळ हा ऊब, प्रियजनांचा सहवास आणि करुणा घेऊन येणारा सण आहे. दया, कृतज्ञता आणि आशा या भावनांनी प्रेरित होऊन यावेळी लोक एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात. घरे दिव्यांनी उजळून निघतात, मन आनंदाने भरून जाते. हा सण आपल्याला सांगतो, ‘थांबा, विचार करा आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या’. या नाताळच्या निमित्ताने सोनी सबवरील कलाकार आपल्यासाठी या सणाचा अर्थ काय आहे, हे सांगत आहेत आणि या सणाशी संबंधित आठवणी, परंपरा आणि दानाचे महत्त्व शेअर करत आहेत.
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विताची भूमिका करणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “नाताळ म्हटले की मला फेअरी लाइट आठवतात, आयत्या वेळी केलेल्या योजना, मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत बसून मारलेल्या गप्पा आठवतात. एकमेकांना छोटी छोटी गिफ्ट देणे किंवा एकत्र जेवण्यामधूनही खूप वेगळा आनंद मिळतो. हा सण आपल्याला अशा छोट्या क्षणांचा आनंद घेऊन शक्य तितका आनंद पसरवण्याची आठवण करून देतो.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “माझ्या कल्पनेत नाताळ आणि सुशोभित केलेली घरं, पार्श्वभूमीवर वाजणारी ख्रिसमसची धुन आणि आपल्या प्रियजनांसमवेत घेतलेला जेवणाचा आस्वाद यांचा अतूट संबंध आहे. ही अशी वेळ असते, जेव्हा तुम्ही आपल्या दैनंदिन दिनचर्येतून वेळ काढता, लोकांना भेटता आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेता. माझ्यासाठी, हा साधेपणाच त्या दिवसाला अर्थपूर्ण बनवतो.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत इंस्पेक्टर संजय भोसलेची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “नाताळ सर्वत्र आनंदाचे वातावरण घेऊन येतो. रस्ते प्रकाशाने उजळून निघतात आणि लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. एखाद्या छोट्या मेळाव्यात जा, केक कापा किंवा घरच्या घरीच आरामात संध्याकाळ व्यतीत करा.. नाताळाचा खरा अर्थ आनंद आणि सकारात्मकता शेअर करण्यातच आहे. ख्रिसमसचे संगीत ऐकणे किंवा कुटुंबीय आणि मित्रांसमवेत बसून गप्पा मारणे यांसारखे छोटे छोटे क्षण देखील या दिवशी खास वाटतात. ही वेळ असते, आपला वेग जरा मंद करून कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आसपासचे छोटे छोटे आनंद अनुभवण्याची.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत प्रोफेसर राजवीर शास्त्रीची भूमिका करणारा गौरव चोप्रा म्हणतो, “माझ्यासाठी, नाताळ साध्या-साध्या परंपरांची स्मृती घेऊन येतो, लोकांच्या भेटीगाठी घडवतो, घरच्या खाद्य पदार्थांचा आनंद देतो आणि कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची सुंदर संधी देतो. आपल्या प्रियजनांसोबत व्यतीत केलेल्या शांत क्षणांमध्ये एक आपलेपणा असतो. दिवसभराच्या धकाधकीनंतर एकत्र बसून गप्पा मारणे असो किंवा जेवता जेवता केलेले संभाषण असो. हा सण आपल्याला आठवण करून देतो की, बऱ्याचदा थोडे संथ होण्यात आणि आसपासच्या लोकांमध्ये मिसळण्यात आनंद लपलेला असतो.”