Home शासकीय राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनाउमेदवारांच्या माहितीसाठी राज्य नि

राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनाउमेदवारांच्या माहितीसाठी राज्य नि

24 second read
0
0
33

no images were found

राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनाउमेदवारांच्या माहितीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत माहितीपुस्तिका

कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचे अधिक्षण (Superintendence), संचालन (Direction) व नियंत्रण (Control) यांचे संपूर्ण अधिकार निहित आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

            महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष, आघाड्या / फ्रंट तसेच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असतात. अशा सर्व इच्छुक उमेदवारांच्या माहितीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत माहितीपुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेमध्ये निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या बाबी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत मांडण्यात आल्या आहेत.

            निवडणूक प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी निवडणूक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणारी अधिकृत जाहिर प्रकटन, सूचना व परिपत्रकांचा इच्छुक उमेदवारांनी अवश्य अभ्यास करावा. सदर माहितीपुस्तिका ही मार्गदर्शक स्वरूपाची असून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ / मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८, अंतर्गत करण्यात आलेले निवडणूक नियम तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निदेश व सूचना हेच अंतिम, ग्राह्य व अधिकृत राहतील.

            महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ ही पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व संबंधित घटकांनी आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…