Home सामाजिक बालिंगा-चंबूखडी ७०० मि.मी. रायझिंग मेनवरील मोठ्या गळतीच्या दुरुस्तीचे कामामुळे बुधवार व गुरुवारी पाणीपुरवठा बंद

बालिंगा-चंबूखडी ७०० मि.मी. रायझिंग मेनवरील मोठ्या गळतीच्या दुरुस्तीचे कामामुळे बुधवार व गुरुवारी पाणीपुरवठा बंद

27 second read
0
0
4

no images were found

बालिंगा-चंबूखडी ७०० मि.मी. रायझिंग मेनवरील मोठ्या गळतीच्या दुरुस्तीचे कामामुळे बुधवार व गुरुवारी पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर,: बालिंगा ते चंबूखडी येथील ७०० मि.मी. व्यासाच्या रायझिंग मेन पाईपलाईनवरील मोठ्या गळतींची दुरुस्ती करण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बुधवार व गुरुवार, दि. ९ व १० सप्टेंबर २०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील संबंधित भागांचा दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

           या कामाचा परिणाम ए व बी वॉर्डसह संलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंट्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड व मंगळवार पेठेतील काही भागांवर होणार आहे.

          तसेच संपूर्ण सी व डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवारपेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब तसेच संलग्न ग्रामीण भाग व उपनगरांनाही पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे.

            ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरीतील ५वी, ६वी, ७वी व ८वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक आदी परिसरातही दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

            पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात टर्म प्लॅन व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के वाढ

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रा…