Home मनोरंजन प्रदीप घुले यांनी ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ च्या १०० भागांवरील काही मनोरंजक किस्से शेअर केले

प्रदीप घुले यांनी ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ च्या १०० भागांवरील काही मनोरंजक किस्से शेअर केले

15 second read
0
0
21

no images were found

प्रदीप घुले यांनी सौ. प्रताप मानसी सुपेकर‘ च्या १०० भागांवरील काही मनोरंजक किस्से शेअर केले

शेमारू मराठीबाणाची लोकप्रिय मालिका ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ मधील प्रतिभावान अभिनेता प्रदीप घुले यांनी निभावलेल्या प्रतापच्या आकर्षक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकतेच या शो ने १०० भाग पूर्ण करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे, याच निमित्ताने अभिनेता प्रदीप घुले ने आपला अनुभव शेअर केला आणि प्रेक्षकांच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केले.

१. ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ शो मधील प्रतापची व्यक्तिरेखा साकारताना तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?

– ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ मध्ये प्रतापची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी एक आनंददायक प्रवास आहे. मी माझ्या आगोदरच्या प्रोजेक्ट मध्ये देखील पोलिसांची भूमिका साकारल्या आहेत परंतु प्रतापची भूमिका साकारणं माझ्यासाठी एक अनोखे आव्हान होते. प्रताप चा स्वभाव माझ्या पूर्वी निभावलेल्या भूमिकांन पेक्षा वेगळा आहे आणि त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या स्वभावापेक्षा सुद्धा वेगळा आहे.  हि व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची आणि एक्स्प्लोर करण्याची संधी होती आणि मी भूमिकेला एक नवीन दृष्टीकोन देऊन संधीचा पुरेपूर आनंद घेतला. प्रतापच्या व्यक्तिरेखेतील गुंतागुंतीमुळे मला एक अभिनेता म्हणून माझ्या कलेला एक नवीन आकार देता आला त्यामुळे माझा हा प्रवास समृद्ध आणि मनमोहक बनला.

२. या शोमध्ये काम करताना तुमचे सर्वात प्रिय क्षण कोणते होते?

– या शोमधील माझा सर्वात प्रिय क्षण निवडणं खूप कठीण आहे, परंतु माझी सह-कलाकार तन्वीसोबतची सेट वरील धमाल आणि मैत्री वेगळी आहे. ती मला सतत चिडवत असते, ज्यामुळे आमचे काम आणखी मजेदार होते. हे हलके-फुलके क्षण सेटवरील वातावरणात आणखी रंग भारतात.

३. या शोच्या निर्मितीदरम्यान पडद्यामागे घडलेली एक अविस्मरणीय घटना तुम्ही शेअर करू शकता का?

– शोच्या निर्मितीदरम्यान, एका समर्पित चाहत्याशी आमची हृदयस्पर्शी गाठ पडली, जो आम्हाला सेटवर भेटण्यासाठी पुण्याहून संपूर्ण प्रवास करून आला होता. त्यांनी स्वतः सोबत केवळ  उत्साहच आणला नाही, तर काही स्वादिष्ट पुणेरी पदार्थ, विशेषत: चवदार भाकरवडी आणल्या. हा आमच्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण होता जो शोसाठी प्रेक्षकांचे अविश्वसनीय प्रेम आणि कनेक्शन प्रतिबिंबित करतो.

४. १०० भाग पूर्ण करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?

– १०० एपिसोड पर्यंत पोहोचणे हे वावटळी सारखे आहे! आम्ही डोळे मिचकावले आणि अचानक हा मोठा टप्पा गाठला. विशेषत: स्त्रियांच्या सामर्थ्याबद्दल आणि प्रताप – मानसी यांच्यातील अतूट बंधन विषयीच्या सशक्त कथनाने मालिकेला किती प्रेम मिळाले हे अविश्वसनीय आहे. आमच्या टीमकडून आम्हाला खूप समर्थन मिळाले आहे.

५.  ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ च्या आगामी भागांकडून दर्शक काय अपेक्षा करू शकतात?

– ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’च्या आगामी भागांमध्ये प्रेक्षक भावनांच्या एक रोलर कोस्टरची अपेक्षा करू शकतात. शो मधील अनोख्या ट्विस्ट साठी स्वत: ला तयार करा. मंत्रमुग्ध करणाऱ्या कथानकाचे आश्वासन देऊन शो आणखी मनोरंजक होणार आहे, शो केवळ मनोरंजनच नाही तर दैनंदिन जीवनातील काही मौल्यवान गोष्टी देखील प्रेक्षकांच्या समोर आणेल. सर्व दर्शकांनी प्रताप आणि मानसीच्या प्रवासाचा एक भाग व्हा आणि जीवनातील काही धड्यांन बरोबर मनोरंजनाची सांगड घालणाऱ्या एका तल्लीन अनुभवासाठी सज्ज व्हा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…