Home शैक्षणिक सेमीकंडक्टरमुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला : डॉ. आय. व्ही. बागल

सेमीकंडक्टरमुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला : डॉ. आय. व्ही. बागल

1 second read
0
0
18

no images were found

सेमीकंडक्टरमुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला : डॉ. आय. व्ही. बागल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च गुणवत्तेचे सेमीकंडक्टर तयार करण्यास एपिटॅक्सी तंत्रज्ञान उपयोगी असे प्रतिपादन डॉ. आय. व्ही. बागल, संशोधक, इंटरयुनिव्हर्सिटी मायक्टोइलेक्ट्रॉनिक सेंटर, लुवेन, बेल्जियम यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित “III-V अर्धवाहक एपिटॅक्सी पद्धतीने तयार करण्यातील संशोधन” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डॉ. आय. व्ही. बागल यांचा परिचय डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी करून दिला. डॉ. बागल यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. बागल यांनी त्यांची संशोधनातील वाटचाल सांगून व्याख्यानाची सुरवात केली. त्यांनी एपिटॅक्सी या शब्दाच्या अर्थ उलगडून त्याचा इतिहास सांगितला. सेमीकंडक्टर पदार्थ विद्युतवाहक आणि विद्युतरोधक यांच्यामध्ये असतो. सेमीकंडक्टर पदार्थ हे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि उपकरणांमध्ये विद्युत प्रवाहाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करतात. परिणामी, हे संगणकासाठी बनवलेले इलेक्ट्रॉनिक चिप्स, सॉलिड-स्टेट स्टोरेजसह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी बनवलेला एक लोकप्रिय घटक आहे.

या उपकरणांना उत्कृष्ट बनवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकणारे एपिटॅक्सियल तंत्रज्ञान वापरले जाते. तसेच त्यांनी एपिटॅक्सीचे उच्च गुणवत्तेचे सेमीकंडक्टर तयार करण्यात महत्त्व: अधोरेखित केले. एपिटॅक्सियल तंत्रज्ञान वापरून सेमीकंडक्टरच्या गुणधर्मांमध्ये बदल करण्यासाठी वापरला जाते ज्यामुळे त्याची विद्युत चालकता सुधारते व उच्च गुणवत्तेचे अर्धवाहक तयार होतात. वाढत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे उत्तम सेमीकंडक्टरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली असून कौशल्य असलेल्या युवा मनुष्यबळाची गरज वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की उच्च गुणवत्तेचे सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. त्यांनतर प्रश्नोत्तरे चर्चा झाली त्यामध्ये उत्स्फूर्तपणे अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रा. सोनकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बागल यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील संशोधन कार्यात भरारी घेऊ शक्ती याचे डॉ. बागल हे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. तसेच कोविडच्या काळात जगभरात सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा जाणवला त्याचा फटका सर्वच उद्योगांना बसला. भविष्यातही अश्या समस्या उदभवू शकतात त्यामुळे भारतामध्ये सेमीकंडक्टर व्यवसायाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. डॉ. एस. एस. पाटील यांनी व्याख्यान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून आभार मानले. नेहा शहा व साधना परीट या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे कुशलतेने सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, प्रा. डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. यु. एम. चौगुले, डॉ. ए. आर. पाटील यांच्यासह अधिविभागातील विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले. विभागप्रमुख झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध व्याख्याने आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …