
no images were found
जीटीटी डेटाच्या विस्तारामुळे पुढील तीन वर्षांत ५०० स्थानिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना
सांगली : विशेष मानवी तज्ज्ञता आणि प्रगत एआय-चालित तंत्रज्ञानाच्या मिलाफातून प्रोप्रायटरी ड्युएल इंटेलिजन्स सोल्यूशन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या जीटीटी डेटा सोल्यूशन्स ही कंपनी स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रतिभावंत विद्यार्थ्यांची नियुक्ती करून आणि आपले नोंदणीकृत कार्यालय कोलकाताहून सांगली येथे हलवून सांगलीमध्ये आपली उपस्थिती वाढविण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या जीटीटी डेटा सोल्यूशन्सकडे ७०० कर्मचाऱ्यांची प्रतिभाशक्ती असून त्यांपैकी ७० कर्मचारी सांगली कॅपॅबिलिटी सेंटरमध्ये कार्यरत आहेत. पुढील तीन वर्षांत सांगलीतील ही संख्या ५०० पर्यंत वाढवण्याचे जीटीटी डेटाचे उद्दिष्ट आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी पुरवण्यासाठी आणि बहरणाऱ्या आयटी इकोसिस्टिमला चालना देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जीटीटी डेटाचे या प्रदेशातील आयटी प्रतिभावंतांचे अग्रगण्य एम्प्लॉयर म्हणून आपले स्थान बळकट करण्याचे लक्ष्य आहे.
सुमारे १८ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अभियांत्रिकी पदवीधरांच्या मोठ्या संख्येसाठी सांगली ओळखली जाते. आतापर्यंत वापरल्या न गेलेल्या आयटीच्या विकासासाठी तिथे मोठी क्षमता आहे. स्थानिक प्रतिभेला रोजगार पुरवून आणि महानगरांमध्ये स्थलांतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून, या शहरात एक शाश्वत आणि भरभराटीचे आयटी हब तयार करण्याचा जीटीटी डेटाचा मानस आहे. आयटी नोकऱ्यांच्या निर्मितीमुळे सांगलीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला योगदान मिळेल, सहायक उद्योगांना चालना मिळेल आणि एकंदर विकासाला चालना मिळेल असा अंदाज आहे. उद्योगाच्या व्यापक ट्रेंडशी हे सुसंगत असून टियर २ आणि ३ शहरांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये २०२३ ते २०२४ पर्यंत २५-३५% वाढ झाली आहे. अॅट्रिशन आणि ऑपरेशनल खर्च ऑप्टिमायझेशन करण्याची कंपन्यांची इच्छा असणे हे याला कारण आहे.
जीटीटी डेटाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज समानी म्हणाले, “आमचे यापूर्वीच सांगलीमध्ये डेव्हलपमेंट सेंटर असून लक्षणीय प्रमाणात त्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. स्थानिक अभियांत्रिकी पदवीधरांना स्थलांतर न करता उच्च दर्जाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याची हमी देत शहरातील प्रथम श्रेणीचे एम्प्लॉयर बनणे हे आमचे ध्येय आहे.”
सांगली शहराशी असलेल्या गहन संबंधांमुळे कंपनीने आपले नोंदणीकृत कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सुरुवातीच्या अनेक गुंतवणूकदारांचे मूळ सांगलीत असून तिच्या अनेक प्रमुख व्यक्तींचे या भागाशी बळकट संबंध आहेत. केवळ व्यवसाय वाढच नव्हे तर सामुदायिक विकासासाठीही जीटीटी डेटाची कटिबद्धता या स्थलांतरातून अधोरेखित होते. जीटीटी डेटाचा सांगलीतील धोरणात्मक विस्तार हा आर्थिक वाढ आणि तांत्रिक प्रगतीचे इंजिन म्हणून ते लहान शहरांच्या विकासावर भर देणाऱ्या विकसित भारत मिशन आणि व्हिजनशीही सुसंगत आहे. सध्या सांगलीमध्ये संस्थापकांच्या मालकीच्या २०-२५ तंत्रज्ञान कंपन्या आहेत असे अभिमानाने सांगता येते.
जीटीटी डेटाचे सीईओ गोपाल पटवर्धन म्हणाले, “सांगलीतील अनेक महाविद्यालयांमधून नवीन पदवीधरांची भरती करून आणि त्यांना प्रशिक्षण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन एक बळकट प्रतिभेचा साठा तयार करण्यावर आमचा भर आहे. या पदवीधरांकडे असामान्य तांत्रिक क्षमता असून उद्योगाच्या मानकांशी जुळवून घेण्यासाठी त्यांची सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन वाढवण्यावरही आम्ही भर देतो. एआय तज्ज्ञता आणि प्रगत डेटा विश्लेषणापासून ते नेतृत्व आणि गंभीर विचारसरणीपर्यंत सध्याच्या तंत्रज्ञानाच्या वातावरणात पुढे येण्यास मदत करण्यासाठी महत्त्वाच्या कौशल्यांनी या तरुण मनांना आम्ही सुसज्ज करू इच्छितो. क्लायंट प्रकल्पांमध्ये पूर्णपणे रूळण्यासाठी नवीन भरती झालेल्यांना थोडा वेळ लागतो, परंतु त्यांच्या वाढीसाठी गुंतवणूक करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
सांगलीशी खोलवर रुजलेले संबंध, स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची कटिबद्धता आणि धोरणात्मक विस्तार योजनांसह, या प्रदेशातील आयटीच्या वातावरणाची नव्याने रचना करण्यास जीटीटी डेटा सज्ज आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून आणि सांगलीमध्ये आपली उपस्थिती मजबूत करून, कंपनी सांगलीच्या उदयोन्मुख आयटी क्षेत्रात नावीन्य आणि वाढीचा दीपस्तंभ बनण्यास सज्ज आहे.जीटीटी डेटा सोल्यूशन्स लिमिटेडबद्दल :जीटीटी डेटा सोल्युशन्स लिमिटेड ही मुंबई स्टॉक एक्स्चेंजमध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध केलेली तंत्रज्ञान कंपनी असून ती ड्यूएल इंटेलिजेंसमध्ये विशेषज्ञ आहे — व्यवसायातील परिवर्तनाला चालना देण्यासाठी मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे ती एकत्रीकरण करते. तिच्या सेवांमध्ये डेटा अभियांत्रिकी, प्रगत विश्लेषण, एआय-संचालित ऑटोमेशन आणि आयटी सेवा व्यवस्थापन यांचा समावेश असून त्यामुळे व्यवसायांना ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यास, निर्णय घेण्यास आणि नवोपक्रमाला गती देण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे हे जीटीटी डेटाच्या प्रभावाचा एक प्रमुख आधारस्तंभ असून त्यातून २० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि कॉर्पोरेट क्लायंटना डेटा व्यवस्थापन, विश्लेषण आणि एआय तंत्रज्ञानात प्रशिक्षित करण्यात आले आहे.