Home विमा आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर लाँच, भारतातील महिलांना त्यांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठबळ मिळणार  

आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर लाँच, भारतातील महिलांना त्यांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठबळ मिळणार  

58 second read
0
0
8

no images were found

आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर लाँचभारतातील महिलांना त्यांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठबळ मिळणार  

  • महिलांसाठी डिझाइन केलेले एक सर्वसमावेशक संरक्षण सोल्यूशन.
  • महिलांसाठी १५ टक्‍के लाईफटाइम प्रीमियम सूट प्रदान करते.
  • अधिक आर्थिक स्थिरतेसाठी प्रेग्नन्सी ब्रेक बेनिफिटचा (गर्भावस्थेतील सवलत) समावेश.
  • २५,००० रूपयांपर्यंतचे अतिरिक्त महिला-विशेष आरोग्य व्यवस्थापन सेवा आणि वेलनेस फायदे प्रदान करते.
  • १० वर्षांसाठी वाढत्या उत्पन्न पेआउट पर्यायाद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा प्रदान करते.

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सने विशेषतः महिलांसाठी डिझाइन केलेला सर्वसमावेशक टर्म प्लॅन ‘आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर’ लाँच केला आहे. लाईफ इन्शुरन्ससोबत (जीवन विमा) आरोग्य आणि वेलनेस फायद्यांची सांगड घालून महिलांच्या बदलत्या संरक्षण आणि वेलनेस गरजा पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन डिझाइन करण्यात आले आहे.

आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर फायद्यांचा विचारपूर्वक निवडलेला संच प्रदान करते, जे महिलांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या क्षणांमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी डिझाइन केले आहेत. यामध्ये १५ टक्‍के लाईफटाइम प्रीमियम सूट, महिला-विशेष आरोग्य व्यवस्थापन आणि वेलनेस सेवा, तसेच प्रेग्नन्सी ब्रेक वैशिष्ट्याची स्थिरता समाविष्ट आहे. ज्यामुळे त्यांना आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्या प्रीमियमच्या कटिबद्धतेचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे शक्य होते. याव्यतिरिक्त, हे उत्पादन १० वर्षांसाठी वाढत्या उत्पन्न पेआउट पर्यायाद्वारे ‘चाइल्ड एज्युकेशन केअर’ (मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा) प्रदान करते. या पर्यायासह, मृत्यू लाभ नामांकित व्यक्तीला उत्पन्नाच्या स्वरूपात दिला जातो, जो १० वर्षांसाठी दरवर्षी वार्षिक १० टक्‍के दराने वाढतो.

या लाँचबाबत मत व्यक्त करत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. विकास गुप्‍ता म्हणाले, “भारतातील महिला अनेक भूमिका निभावतात. परिणामी, त्यांच्या आर्थिक नियोजनाच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि या गरजा आयुष्याच्या विविध टप्प्यांवर बदलत राहतात. आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर त्यांच्या अद्वितीय आरोग्यसेवा आणि वेलनेस गरजा पूर्ण करण्‍यासोबत सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. लाईफ इन्शुरन्सची अर्थपूर्ण आरोग्य व्यवस्थापन सेवांशी सांगड घालून आणि प्रेग्नन्सी ब्रेक बेनिफिट व लाईफटाइम प्रीमियम सूट यांसारख्या वैशिष्ट्यांद्वारे अधिक स्थिरता देऊन, आम्ही सर्वोत्तम सोल्यूशन देत आहोत, जे महिलांना त्यांचे आर्थिक भविष्य आणि एकूण स्वास्थ्य सुरक्षित करण्यास मदत करते.”

या उत्पादनामध्ये महिला-विशेष आरोग्य व्यवस्थापन सेवांचा समावेश आहे, ज्यामध्ये अनेक तज्ज्ञ विभागांमधील टेलिकॉन्सल्टेशन्सची सुविधा, वार्षिक आरोग्य तपासणी, आरोग्य जोखीम मूल्यमापन, वेलनेस माहिती, फार्मसी व डायग्नोस्टिक सवलती आणि इतर आरोग्यसेवा फायद्यांचा समावेश आहे. एकूण, हे उत्पादन ९२,१०० रूपयांपर्यंत फायदे प्रदान करते, ज्यामध्ये २५,००० रूपयांपर्यंत महिला-विशेष आरोग्य आणि वेलनेस फायद्यांचा समावेश आहे, जे महिला ग्राहकांसाठी अधिक मूल्य प्रदान करते.

लाँच करण्यात आलेले आयसीआयसीआय प्रू आयप्रोटेक्ट स्मार्ट हर कंपनीच्या डिजिटल क्षमतेद्वारे समर्थित आहे, ज्यामुळे ग्राहकांना विनाअडथळा खरेदीचा प्रवास, सोयीस्कर स्व-सेवा पर्याय आणि विनासायास दावा प्रक्रिया मिळण्यास मदत होते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स ग्राहकांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याकरिता सक्षम बनवणारी उत्पादने विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. हा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीतील ९९.३ टक्‍क्‍यांच्या उद्योग-अग्रणी दावा निकाल गुणोत्तरामध्ये (क्लेम सेटलमेंट रेशिओ) दिसून येतो, ज्यामध्ये गैर-तपासणी अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक मृत्यू दाव्यांसाठी सरासरी १ दिवसाचा दावा निपटारा कालावधी आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

ऊसतोड मजुरांचे कॅशलेस कार्ड काढण्यात यावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

ऊसतोड मजुरांचे कॅशलेस कार्ड काढण्यात यावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड कोल्हापूर : …