Home Uncategorized आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये टर्म प्लॅन व्यवसायात 60.4% वाढ नोंदवली

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये टर्म प्लॅन व्यवसायात 60.4% वाढ नोंदवली

31 second read
0
0
10

no images were found

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये टर्म प्लॅन व्यवसायात 60.4% वाढ नोंदवली

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने जून 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 27.8% वाढ नोंदवत 386 कोटीं रुपयांचा नफा कमावला. याच कालावधीत कंपनीच्या टर्म प्लॅन (रिटेल प्रोटेक्शन) व्यवसायात वार्षिक 60.4% वाढ झाली. तसेच, कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे नाव बदलून ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

कंपनीचे एमडी आणि सीईओ अनुप बागची म्हणाले, ” ग्राहकांना सर्वाधिक प्राधान्य देणे हा आमच्या धोरणाचा मुख्य भाग आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये आमचा दावा निकाली काढण्याचा दर 99.3% राहिला. तसेच, तपासाची गरज नसलेले दावे सरासरी एका दिवसात निकाली काढण्यात आले. यावरून गरजेच्या वेळी ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांना तत्पर मदत करण्याची आमची बांधिलकी दिसून येते. या तिमाहीत आम्ही मृत्यू दाव्यांपोटी 1,306 कोटींचे दावे मंजूर केले, तर मुदतपूर्ती आणि सर्व्हायव्हल बेनिफिट्स म्हणून 3,360 कोटी रुपये ग्राहकांना दिले. त्यामुळे आमच्या पॉलिसीधारकांना वेळेवर आर्थिक मदत आणि संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न कायम असल्याचे दिसून येते. तसेच, आर्थिक वर्ष 2026 मध्ये आम्ही मृत्यू दाव्यांपोटी  5,149 कोटी रुपये आणि मुदतपूर्ती आणि सर्व्हायव्हल बेनिफिट्स म्हणून  15,363 कोटीं रुपये रक्कम ग्राहकांना अदा केले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ऊसतोड मजुरांचे कॅशलेस कार्ड काढण्यात यावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

ऊसतोड मजुरांचे कॅशलेस कार्ड काढण्यात यावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड कोल्हापूर : …