
no images were found
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर( प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, अक्षय जहागीरदार, सुरज पुरी, स्नेहा कांबळे, सीमा रायमाने, रेखा कांबळे, शबाना मेस्त्री, अंकिता चौगुले आदी उपस्थित होते.