
no images were found
जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकलेने पाच हजार दंड
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजारामपुरी येथील डॉ.चंद्रशेखर पाटील यांचे साई कार्डीयाक सेंटर हॉस्पीटलने जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकल्याने त्यांना नोटीस देऊन रु.5000/- दंड करण्यात आला आहे. महापालिकेच्या घरगुती कचरा संकलन करणा-या ॲटो टिप्परमध्ये बेकादेशीरित्या हा जैव वैद्यकीय कचरा त्यांनी टाकल्याने हा दंड करण्यात आला आहे. हि कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांचे आदेशानुसार आरोग्य निरिक्षकांनी केली आहे.
तसेच राजरामपुरी येथील मोरया हॉस्पीटल, जानकी हॉस्पीटल व स्टार हॉस्पीटलने रस्त्यावर व कोंडाळयाच्या ठिकाणी घातक जैव वैद्यकीय कचरा टाकलेने त्यांच्या आस्थापनांना नोटीस देण्यात आली आहे. हि नोटीस वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 च्या तरतुदीनुसार देण्यात आली आहे. या तरतुदीनुसार या सर्वांना प्रत्येकी रु.5,000/- दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज शास्त्री नगर येथील ॲस्टर आधार हॉस्पीटलच्या येथे सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना पाहणी करताना त्यांच्या कच-यामध्ये बायो मेडिकल वेस्ट आढळून आले आहे. त्यांनाही आज नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिले आहेत.सदरची दंडात्मक कारवाई भागातील आरोग्य निरिक्षक ऋषीकेश सरनाईक, मुनीर फरास, श्रीराज होळकर यांनी केली आहे.