
no images were found
तेनालीसमोरचे सर्वात मोठे आव्हान: लछमाचा जीव कसा वाचवायचा
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेतील दरबारी कवी आणि चतुर अशा तेनाली रामाच्या (कृष्ण भारद्वाज) सुरस कथांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडच्या भागांमध्ये, तेनाली रामा आणि तथाचार्य (पंकज बेरी) रक्त पुष्पाच्या शोधात असताना एका खडकाखाली अडकतात. आणि इकडे लछमा (आरिया सकरिया)ची प्रकृती आणखी ढासळते.आगामी भागांमध्ये, गिरगिट राज (सुमित कौल)ने रचलेल्या सापळ्यातून विजयनगरचे रक्षण करणाऱ्या शूर लछमाचा जीव वाचवण्याच्या निर्धाराने तेनाली एका भयंकर प्रवासावर निघतो. त्याच्या मार्गात अनेक आव्हाने आहेत आणि त्याच्या बुद्धीचातुर्याची कसोटी लागणार आहे. रहस्यमयी रक्त पुष्पाचा शोध घेण्याच्या या प्रवासात त्याच्या सोबत तथाचार्य, धानी आणि मणी देखील आहेत. या मार्गात त्यांना पाच कठोर परीक्षा द्याव्या लागणार आहेत. दरम्यान गिरगिट राज आणि राजा कृष्णदेवराय (आदित्य रेडिज) यांच्यात भयंकर संघर्ष सुरू होतो. या संघर्षात गिरगिट राज आपल्या मायावी शक्तीचा प्रयोग करून राजाला हतबल करू पाहतो. इकडे रामा आणि त्याचे साथीदार अखेरीस त्या रमणीय उद्यानात पोहोचतात. पण तिकडे रक्त पुष्प कुठेच न दिसल्यामुळे ते हताश होतात. आता पुन्हा तेनालीला फूल नाहीसे होण्यामागचे सत्य शोधण्यासाठी आपले बुद्धी बळ वापरण्याची वेळ येते. मात्र कोडे सोडवल्यानंतर आणि ते मौल्यवान फूल हस्तगत केल्यानंतर देखील संकटे येत राहतात, काळ भराभर पुढे सरकत राहतो आणि एक एक क्षण महत्त्वाचा होतो.
लछमाचा जीव वाचवण्यासाठी तेनाली वेळेवर परत येऊ शकणार का?
‘तेनाली रामा’ मालिकेत तेनालीची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “या कथानकातून तेनाली रामाची लवचिकता आणि हुशारी दिसून येते. रक्त पुष्प शोधण्याचा प्रवास अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे. या प्रवासात केवळ त्याच्या हुशारीचीच नाही, तर त्याच्या निर्धाराची देखील कसोटी होते. त्यात गिरगिट राज आणि राजा कृष्णदेवराय यांच्यातल्या युद्धामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होते. त्यामुळे एकंदरित हे फार मोठे साहस त्याला करावे लागणार आहे. आगामी भागांमध्ये, तेनाली काळाच्या गतीवर मात करण्यासाठी धडपड करताना दिसेल. लछमाचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळी कोडी सोडवून, मायावी अडथळे पार करून रक्तपुष्प हस्तगत करताना दिसेल. या भागात अॅक्शन आणि हुशारी यांचे मस्त मिश्रण बघायला मिळेल. प्रेक्षकांना हा अनुभव नक्की आवडेल अशी आशा आहे.”