Home Uncategorized पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

1 min read
0
0
14

no images were found

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये आज थकबाकी असलेली 27 कनेकशन व 7 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करुन रोख रक्कम रुपये 5 लाख 83 हजार 299/- इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली. तसेच चेकद्वारे रक्कम 4 लाख 97 हजार 071 व ऑनलाईन जमा रक्कम 1 लाख 56 हजार 266 रुपये असे एकूण रक्कम रु.13 लाख 36 हजार 633/- इतकी रक्कम जमा झाली आहे.

            सदरची कारवाई शहरातील गंजी गल्ली, लुगडी ओळ, रिकीबदार गल्ली, जवाहरनगर, महालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, न्यु शाहुपुरी, कसबा बावडा, कागलवाडी, डी.वाय.पी. कॉलेज परिसर, धनगर गल्ली, गोळीबार मैदान परिसर इत्यादी भागामध्ये कारवाई करुन कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

            सदरची कारवाई आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवेगार, प्रिया पाटील, महानंदा सुर्यवंशी, सुनिल भाईक, पथक प्रमुख अजित मोहिते, मधु कदम, अमर बागल, संजय पाटील यांनी केली आहे.

            सदरची मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून पाणी बिलाची थकीत रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूर फर्स्टकडूनमहानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स

कोल्हापूर फर्स्टकडूनमहानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग&nbs…