Home सामाजिक कोल्हापूर फर्स्टकडूनमहानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स

कोल्हापूर फर्स्टकडूनमहानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स

44 second read
0
0
10

no images were found

कोल्हापूर फर्स्टकडूनमहानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शहराच्या स्वच्छतेसाठी व नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आली. याचबरोबर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठीही सहकार्य करण्यात येत आहे.

            रेसिडेन्सी क्लब येथील रेजेंटा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात या चार स्विपिंग मशिन्स महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमासाठी महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी विशेष प्रयत्न केले होते.

            शहर स्वच्छतेसाठी स्विपिंग मशिन्स उपलब्ध करून देणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये सुरेश जैन व सचिन मेनन यांचा महापौर रुपाराणी निकम व भरत जाधव व नितीन वाडकर यांचा आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीस सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये सुरेंद्र जैन, सचिन मेनन, भरत जाधव, जे.के.शहा, शंकर दुलहानी व डॉ.गिरीष वझे यांचाही सत्कार करण्यात आला.

            यावेळी महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शहर स्वच्छता व नागरी सुविधांच्या उभारणीत सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन प्रताप पाटील यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…