Home Uncategorized उद्योग-विद्यापीठ सहकार्यातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

उद्योग-विद्यापीठ सहकार्यातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

1 second read
0
0
6

no images were found

उद्योग-विद्यापीठ सहकार्यातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठाचा ग्रीन सोल्युशन्स इंडस्ट्रीजसमवेत सामंजस्य करार

कोल्हापूर: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, अद्ययावत तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणे, आजच्या शिक्षणप्रणालीत अभिप्रेत आहे. विद्यापीठातील शैक्षणिक व संशोधनविषयक क्षमता आणि उद्योगक्षेत्रातील व्यावहारिक अनुभव यांची सांगड घातल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह संशोधनालाही नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठ आणि पुणे येथील ग्रीन सोल्युशन्स इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्यात काल झालेल्या सामंजस्य करारावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, प्रात्यक्षिक अनुभव आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बदलत्या औद्योगिक गरजा आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्राचा अनुभव मिळाल्यास त्यांची व्यावसायिक तयारी अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तसेच, विद्यापीठ आणि उद्योग यांच्यातील सहकार्यामुळे ज्ञानाचे व्यावहारिक उपयोगात रूपांतर करण्याच्या संधीही वाढतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनविषयक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध संस्था, उद्योग आणि संशोधन केंद्रांशी सहकार्य वाढविणे आवश्यक आहे. अशा सहकार्यातून ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधनाला व्यावहारिक दिशा आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

ग्रीन सोल्युशन्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवाळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. उद्योगक्षेत्रातील अनुभव आणि विद्यापीठातील शैक्षणिक व संशोधनविषयक कौशल्य यांच्या परस्परपूरक वापरातून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाच्या आणि ज्ञानविस्ताराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, या दृष्टीने या सहकार्याला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि श्री. अहिवाळे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव, ग्रीन सोल्युशन्सच्या आरती भोसले आणि विद्युलता पाटील उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्या…