
no images were found
गीतांजली मिश्रा यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये राजेशची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री गीतांजली मिश्रा यांनी नुकतेच महाकुंभ येथे आध्यात्मिक प्रवासाचा आनंद घेण्यासोबत पवित्र नदीमध्ये पवित्र स्नान केले. दर १२ वर्षांनी आयोजित केला जाणारा हा भव्य आध्यात्मिक मेळावा हिंदू धर्मामधील सर्वात आदरणीय मेळावा आहे, जेथे लाखो भक्त शुद्धीकरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी येतात. गीतांजली यांना या आध्यात्मिक प्रवासासोबत निष्ठा, भक्ती आणि मन:शांतीचा अनुभव मिळाला. या खास क्षणाबाबत सांगताना गीतांजली ऊर्फ राजेश म्हणाल्या, “महाकुंभात असण्याचा अनुभव अविश्वसनीय होता. तेथील ऊर्जा, लयबद्ध मंत्र आणि भक्ताचा अतूट विश्वास पाहून मी भारावून गेले. स्नान करण्यापूर्वी मी घाटांवरून चालत गेले आणि उदबत्तीचा सुगंध, शंखांचा आवाज व साधूंचे सखोल ध्यानातील दृश्य यासह भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले. अंत:करणामध्ये मन:शांती मिळाल्यासारखे वाटले. मी पाहिलेली प्रत्येक प्रार्थना आणि मी ऐकलेल्या प्रत्येक मंत्रासह देवासोबतचे माझे नाते अधिक दृढ झाले. शेवटी पवित्र नदीमध्ये स्नानासाठी गेल्यानंतर अद्वितीय मन:शांती मिळाली. पवित्र पाण्याने माझ्या आत्म्याला शुद्ध केल्यासारखे आणि सर्व चिंता पाण्यातील लहरींसह दूर झाल्यासारखे वाटले.”
या प्रवासाच्या महत्त्वाबाबत सांगताना त्या म्हणाल्या, “प्रयागराज शहरात तल्लीन करणारी आध्यात्मिक ऊर्जा पसरली होती. भक्त मोठ्या संख्येने येत होते, तरीदेखील लोकांचे आदरातिथ्य, श्रद्धा आणि समर्पण हृदयस्पर्शी होते. ४३ दिवस त्यांनी सर्वांना सुरळीत आणि समृद्ध अनुभव देण्यासाठी अथक परिश्रम केले. देशातील जवळपास अर्धी लोकसंख्या एकाच ठिकाणी एकत्र आली, तरीही सर्वत्र भक्ती, शिस्त आणि दयाळूपणाचे वातावरण होते. अशा चार ते पाच पिढ्यांमधून एकदाच घडणाऱ्या संस्मरणीय घटनेचे साक्षीदार होताना देवाचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटले. आध्यात्मिकतेचा हा प्रवास पूर्ण करण्यापूर्वी मी पवित्र श्री नागवासुकी मंदिर आणि श्री बडे हनुमानजी मंदिराला देखील भेट दिली. या दोन्ही मंदिरांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे.”