Home राजकीय भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत ४१ उमेदवार, तालुकानिहाय युती व स्वतंत्र लढतींची आखणी

भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत ४१ उमेदवार, तालुकानिहाय युती व स्वतंत्र लढतींची आखणी

8 second read
0
0
33

no images were found

भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत ४१ उमेदवार, तालुकानिहाय युती व स्वतंत्र लढतींची आखणी

कोल्हापूर(प्रतिनिधी):जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून ४१ जणांना उमेदवारी, तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार, काही तालुक्यात स्वतंत्र, तर काही तालुक्यात युती म्हणून किंवा मैत्रीपूर्ण लढत होणार

भारतीय जनता पार्टीच्यावतीनं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाईल. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

करवीर तालुक्यातील दक्षिण विभागात आणि राधानगरी तालुक्यात भाजप स्वतंत्र लढणार आहेत. याशिवाय गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातही भाजप स्वतंत्रपणे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. गगनबावडा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झालीय. पन्हाळा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असून, जनसुराज्य शक्ती पक्षाशी मैत्रीपूर्ण लढत होईल. तर शाहूवाडी तालुक्यात भाजप आणि जनसुराज्य शक्ती यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असेल.

 हातकणंगले तालुक्यात भाजप-शिवसेना युती आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत करतील. शिरोळमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार असून, कागल आणि करवीर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी एकत्र असेल. तर भुदरगडमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील. याशिवाय आजरा आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.  खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …