Home Uncategorized हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !

10 second read
0
0
20

no images were found

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !

       मुंबई – राणी पद्मावती यांसह अन्य हिंदू रजपूत स्त्रियांनी शीलरक्षणासाठी केलेल्या ‘जोहार’ला भित्रेपणा म्हणणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना हिंदू विधीज्ञ परिषदेने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. २५ लाख रुपयांची हानी भरपाई आणि भविष्यात हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अवमानकारक वक्तव्य न करण्याची ग्वाही, अशी मागणी नोटीसेद्वारे करण्यात आली आहे. हिंदू धर्मप्रेमी श्री. रमेश कडगले यांच्या सूचनेनुसार हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता अनेश परळकर यांनी ही नोटीस पाठवली आहे. 

      ३१ ऑगस्ट या दिवशी ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मधील एका कार्यक्रमात ‘पद्मावती’ या हिंदी चित्रपटातील ‘जोहार’च्या प्रसंगाचे वर्णन करतांना अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्याद नसून वाजवी मर्यादांच्या अधीन आहे. स्वरा भास्कर अहमद यांनी मात्र वक्तव्यातून महाराणी पद्मावती आणि ‘जोहार’ करणार्‍या वीरांगना यांचे शौर्य, त्याग व आत्मसन्मान यांचा अवमान झाला आहे. माझ्यासह जगभरातील हिंदू आणि रजपूत समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना यामुळे दुखावल्या आहेत. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जावी. स्वरा भास्कर अहमद यांनी केलेले अवमानकारक वक्तव्य त्वरित मागे घ्यावे आणि हिंदू समाज व विशेषत: रजपूत महिला यांची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी, अशी माझी मागणी आहे. 

.. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल ! – अधिवक्ता अनेश परळकर, हिंदु विधीज्ञ परिषद

स्वरा भास्कर अहमद यांनी स्वत:च्या सर्व सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ, संदेश, रिल्स, क्लीप्स आदी विविध प्रकारांत असलेले सर्व संदर्भ त्वरित हटवावेत. भविष्यात हिंदु धर्म, परंपरा आणि ऐतिहासिक महापुरुष यांच्याविषयी कोणतेही अवमानकारक वक्तव्य करणार नाही, याचे त्यांना लेखी हमीपत्र द्यावे. नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत या सर्व मागण्यांची पूर्तता न केल्यास स्वरा भास्कर अहमद यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याची आणि दिवाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, अशी चेतावणी अधिवक्ता अनेश परळकर यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहन

पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आव…