
no images were found
मुख्य वीज वाहिनीचे कामकाज करण्यात येणार असलेने संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा सोमवारी एक दिवस बंद
कोल्हापूर :- सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी काळम्मावाडी योजनेच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम व बालिंगा सब स्टेशन च्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरूस्तीचे कामकाज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी या पंपांचा विद्युत पुरवठा बंद रहाणार असलेने पाणी उपसा होऊ शकणार नाही. संपुर्ण शहरातील ए,बी,सी,डी,ई वॉर्ड सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागामध्ये सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहील. तसेच मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी होणार पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तरी सोमवारी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.