
no images were found
स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र
मुंबई : ‘सुशीला-सुजीत’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण संपन्न झालं असून चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल रसिक प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत सुद्धा मोठी उत्कंठा लागून राहिली आहे. पोस्टरवर स्वप्नील आणि सोनाली यांचे चेहरे एका की-होलमधून दिसतात. त्यांचे चेहरे पुरेसे बोलके असून त्यावरील अचंबित भाव स्पष्ट जाणवतात. त्यामुळे चित्रपटाबद्दलचे कुतूहल आणखी ताणले गेले आहे. ‘ दरवाजाच्या आड काय आहे गुपित..? सांगायला येत आहेत “सुशीला – सुजीत” अशी या पोस्टर ची टॅगलाईन आहे.स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ चे दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहेत. पॅनोरमा स्तुडिओज या चित्रपटाचे वितरक आहेत.
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्सची ही निर्मिती आहे. प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शक आणि संजय मेमाणे सिनेमॅटोग्राफर हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानले जाते. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. “सोनाली आणि स्वप्नील हे थोडेसे वेगळे कास्टिंग या चित्रपटासाठी आम्ही केले आहे. या दोघांची कामाची पद्धत आणि इमेजसुद्धा भिन्न आहे. आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर त्याची झलक दिसून येते,” असे प्रसाद ओक म्हणाले.चित्रपटाबद्दल बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला, “या आगामी चित्रपटात कित्येक गोष्टी पहिल्यांदाच साध्य होत आहेत.‘सुशीला-सुजीत’च्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. चित्रपटाबद्दल लोकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत कुतूहल आहे. सोनाली, प्रसाद आणि मी पहिल्यांदाच एकत्र येत आल्याने आमच्यासाठीही हा एक वेगळा अनुभव आहे. ”
—