Home Uncategorized सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

56 second read
0
0
4

no images were found

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत दोन्ही केंद्रांचे उत्कृष्ट कामगिरीराष्ट्रीय मूल्यांकनासाठीही पात्र

कोल्हापूर, : शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. १० सिध्दार्थनगर आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. ११ मोरे माने नगर या दोन्ही आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सिध्दार्थनगर केंद्राने ९४.६० टक्के, तर मोरे माने नगर केंद्राने ९३.८० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोन्ही आरोग्य केंद्रांची आता राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनासाठी पात्रता झाली आहे.

            महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सन २०२५-२६ व २०२६-२७ या कालावधीत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त चेकलिस्टच्या आधारे या कार्यक्रमामध्ये चार टप्प्यांत मूल्यांकन केले जाते. यामध्ये प्रथम संस्थेचे स्वमूल्यांकन, त्यानंतर जिल्हास्तरीय मूल्यांकन आणि पुढील टप्प्यात राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यात येते. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. १० सिध्दार्थनगर आणि क्र. ११ मोरे माने नगर या दोन्ही संस्थांचे जिल्हास्तरीय मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर त्या राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यानुसार दि. २७ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राज्यस्तरावरील दोन सदस्यीय पथकाने दोन्ही केंद्रांचे मूल्यांकन केले. सांगली येथील डॉ. मुजाहिद अलासकर आणि सातारा येथील श्रीमती राधिका माने यांनी राज्यस्तरीय मूल्यांकन केले.

            या मूल्यांकनादरम्यान केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाच्या चेकलिस्टनुसार आरोग्य केंद्रातील १२ विविध विभागांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आरोग्य सेवा, रुग्ण सुविधा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि गुणवत्ता निकषांची पडताळणी करण्यात आली. या मूल्यांकनात सिध्दार्थनगर केंद्राला ९४.६० टक्के आणि मोरे माने नगर केंद्राला ९३.८० टक्के गुण मिळाले. तसेच राज्यस्तरीय प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली पाचही मानांकने पूर्ण केल्याने दोन्ही आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या यशामुळे दोन्ही केंद्रे आता राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकनासाठी पात्र ठरली आहेत.

            या कामगिरीसाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरणकुमार धनवाडे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, आरसीएच ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडिक, शहर लेखा व्यवस्थापक प्रताप पाटील, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. संदीप पाटील, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक श्रीमती नेहा भोई यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.

            सिध्दार्थनगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्र चन्देल, मोरे माने नगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश गणेशाचार्य तसेच दोन्ही केंद्रांतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या यशासाठी सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * आशा भ…