
no images were found
टोयोटा फॉर्च्युनर आणि लिजेंडरने भारतात 3 लाख विक्रीसह गाठले मैलाचे शिखर
बेंगळुरू,: भारताच्या प्रीमियम एसयूव्ही बाजारात आपली अग्रगण्य उपस्थिती पुन्हा अधोरेखित करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टिकेएम) ने आज एक मोठा टप्पा गाठल्याची घोषणा केली. टोयोटा फॉर्च्युनर आणि लिजेंडर या एसयूव्हीच्या एकत्रित विक्रीने 3 लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे. हा विक्रमी टप्पा केवळ या प्रीमियम एसयूव्हीची अपराजित लोकप्रियतेताच नव्हे तर टोयोटाची विश्वासार्ह आणि हाय परफॉर्मन्स गाड्या देण्याची कटिबद्धता दर्शवतो, ज्या पॉवर आणि प्रिसिजनचा उत्तम मिलाफ साधतात.
2009 मध्ये बाजारात पदार्पण केल्यापासून, टोयोटा फॉर्च्युनरने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन मानदंड निर्माण केला आहे. ही एसयूव्ही मजबूत ताकद आणि जबरदस्त परफॉर्मन्स यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. यात दिलेले दमदार 2.8 लिटर डिझेल इंजिन 204 पीएस ची पॉवर आणि 500 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे ही एसयूव्ही जबरदस्त ऑफ-रोड क्षमता बाळगते व साहसी आणि ड्रायव्हिंग प्रेमींसाठी एक आदर्श पर्याय बनते. टोयोटाची सिद्ध लॅडर-फ्रेम आर्किटेक्चर आणि प्रगत 4×4 क्षमतांमुळे फॉर्च्युनर प्रत्येक प्रवासात एक विश्वासार्ह साथीदार ठरतो— मग ते खडतर रस्ते असोत वा सरळ महामार्ग.
फॉर्च्युनर ही केवळ परफॉर्मन्ससाठी तयार केलेली एसयूव्ही नाही, तर ती एक ठसा(स्टेटमेंट) उमटवणारी गाडी आहे. तिचा दमदार आणि भारदस्त लूक, उंच ग्राउंड क्लिअरन्स आणि प्रभावी ड्रायव्हिंग पोझिशन रस्त्यावरील तिच्या ताकदीची अनुभूती देतात. वर्चस्व गाजवण्यासाठी डिझाइन केलेली, फॉर्च्युनर केवळ रस्त्यावर धावत नाही तर आपली सत्ता गाजवते. तिचा स्कलचर्ड बाह्य एक्सटेरियर, सिग्नेचर एलईडी लाईट्स आणि प्रीमियम इंटीरियर्स हे दाखवतात की ही गाडी अशा ग्राहकांसाठी बनवलेली आहे जे ‘प्रेझेन्स विद परपज’ शोधतात. त्यामुळे ही एक आयकॉनिक एसयूव्ही ठरली आहे.
2021 मध्ये सादर झालेली लिजेंडर ही एसयूव्ही या परंपरेवर आधारित आहे, पण विशेषतः आधुनिक शहरी चालकांसाठी डिझाइन केल्याने ती अधिक लक्झरियस आणि फिचर पॅकड अनुभव देते. ड्युअल-टोन स्टायलिंग, सिक्वेन्शियल एलईडी टर्न इंडिकेटर्स, वायरलेस चार्जिंग आणि 11-स्पीकर जेबीएल ऑडिओ सिस्टीम यांसारख्या वैशिष्ट्यांसह लिजेंडर अधिक जबरदस्त ड्रायव्हिंग अनुभव देते. तिच्या प्रगत 4×4 क्षमतेमुळे ती सिटी ऍडव्हेंचर तसेच ऑफ-रोड ड्राइविंगसाठी आदर्श एसयूव्ही आहे.फॉर्च्युनर आणि लिजेंडर या एसयूव्ही गाड्यांची खरी खासियत म्हणजे त्यांची अपराजित विश्वासार्हता, मजबूत रीसेल व्हॅल्यू आणि कमी देखभाल खर्च—जे टोयोटाच्या विश्वासार्ह ब्रँड वचनात खोलवर रुजलेले गुणधर्म आहेत.
या ऐतिहासिक टप्प्यावर टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स, सर्व्हिस आणि यूज्ड कार व्यवसायाचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, “भारतामधील सर्व फॉर्च्युनर आणि लिजेंडर चाहत्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांच्या विश्वासामुळे आम्ही 3 लाख विक्रीचा उल्लेखनीय टप्पा गाठू शकलो. फॉर्च्युनर आणि लिजेंडर या एसयूव्ही गाड्या आजही लक्झरी, परफॉर्मन्स आणि विश्वासार्हता यांचा परिपूर्ण मिलाफ शोधणाऱ्या एसयूव्ही चाहत्यांची पहिली पसंती आहेत. शहरातील रस्ते असोत किंवा आव्हानात्मक ट्रेल्स, या गाड्या प्रीमियम अनुभूतीसोबतच मजबूत ताकदही देतात. टोयोटाच्या प्रसिद्ध क्यूडीआर (क्वालिटी, ड्युरॅबिलिटी, रिलायबिलिटी) तत्त्वांवर आधारित या गाड्या आमची इंजिनीरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्सेलन्स दर्शवतात. ही तत्त्वे टोयोटाच्या ग्लोबल रेप्युटेशनचे केंद्रबिंदू आहेत जी केवळ टिकाऊच नाहीत तर सातत्यपूर्ण कामगिरी करणारी वाहने पुरवितात आणि कालांतराने त्यांचे मूल्य देखील टिकवून ठेवतात, अशा प्रकारे सर्वांना फायदेशीर ठरत आनंदाचे क्षण आयुष्यात आणतात.”
या यशात आणखी भर टाकणारी गोष्ट म्हणजे टोयोटाची ग्राहक-केंद्रित सेवा प्रणाली—टी-केयर, जी टोयोटा गाडीच्या संपूर्ण मालकी प्रवासात एक अखंड अनुभव देते. प्री-सेल्सपासून आफ्टर-सेल्स, पुनर्खरेदीपर्यंत टी-केयरच्या अंतर्गत टी-डिलिव्हर, टी-ग्लॉस, टी-असिस्ट, टी-साथ,टी-सेक्युर, टी-चॉईस, टी-इंस्पेक्ट आणि टी-स्माईल यांसारखी सेवा दिली जाते, जी प्रत्येक ग्राहकाला दीर्घकालीन समाधान आणि मूल्य प्रदान करते.
या ऐतिहासिक टप्प्यामुळे टोयोटा फॉर्च्युनर आणि लिजेंडर या गाड्यांनी पुन्हा एकदा प्रीमियम एसयूव्ही क्षेत्रात आपला दबदबा सिद्ध केला आहे—या गाड्या केवळ रस्ते जिंकत नाहीत तर लोकांचे मनही जिंकतात. टोयोटाच्या क्वालिटी आणि ड्रिव्हन बाय द व्हॉइस ऑफ द कस्टमर या लेगसीने प्रेरित असलेल्या या एसयूव्ही गाड्या, उद्देश,(परपज) आत्मविश्वास(प्रेझेन्स) आणि अभिमानासह(प्राईड) गाडी चालवण्याचा अर्थ नव्याने परिभाषित करत आहेत.