Home शासकीय मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार

35 second read
0
0
25

no images were found

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार

 

            मुंबई : मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे.

            महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व 1 एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या कामकाजासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरील दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

            या अनुषंगाने मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी चालू राहणार असल्याने या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…