Home Uncategorized राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत करवीर तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत करवीर तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप

5 second read
0
0
13

no images were found

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत करवीर तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप

कोल्हापूर  : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानांतर्गंत तहसील कार्यालय, करवीरच्यावतीने VJNT समाजातील पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा, दाखले व योजनांच्या लाभांचे वितरण जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते ताराराणी सभागृहात आज करण्यात आले.

     यावेळी बोलताना डॉ राठोड म्हणाले,या उपक्रमाद्वारे शासन – प्रशासन हे सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत जात असून विविध माध्यमांद्वारे सोई – सुविधा देत आहे. जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आज शासनाने लाभ दिला आहे , तथापि शासनाच्या या लाभापासून एकही पात्रताधारक लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल . भविष्यातही असे उपक्रम प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहेत त्यामुळे लाभापासून वंचित रहाणाऱ्यांनी चिंता करू नये असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

     सदर उपक्रमांतर्गत यावेळी दुर्बल – वंचित घटकातील नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी करवीर प्रांतधिकारी मोसमी चौगुले यांनी या उपक्रमा पाठीमागील भूमिका विषद केली तर तहसीलदार स्वप्नील पवार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण विभागच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लीकर ,अशासकीय सदस्य श्री देशपांडे,श्री लाखे यांच्यासह इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पुणे, : महाराष्ट्र विधान…