Home Uncategorized केशवराव भोसले नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग सुरू

केशवराव भोसले नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग सुरू

5 second read
0
0
20

no images were found

केशवराव भोसले नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग सुरू

प्रत्यक्ष कार्यक्रमांना ११ ऑक्टोबरपासून सुरुवात; तीन सत्रांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

 

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संस्था-संघटनांचे कार्यक्रम तसेच नागरिकांसाठीच्या विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन बुकिंग आज, मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये दि. १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र नाट्यगृहासाठी ट्रान्सफॉर्मर बसविणे, वीजपुरवठा सुरू करण्यास झालेला विलंब तसेच काही तांत्रिक कामे पूर्ण करण्यास लागलेला अतिरिक्त वेळ यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू करण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता दि.११ ऑक्टोबर २०२६ पासून नाट्यगृहामध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. नाट्यगृहामध्ये कार्यक्रमांसाठी सकाळी ९ ते दुपारी १, दुपारी ३ ते सायंकाळी ६ आणि रात्री ८ ते रात्री १२ अशा तीन सत्रांमध्ये कार्यक्रम घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये कार्यक्रम आयोजित करू इच्छिणाऱ्या संबंधित संस्था, संघटना, आयोजक तसेच नागरिकांनी https://web.kolhapurcorporation.gov.in या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पुणे, : महाराष्ट्र विधान…