Home मनोरंजन ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत एक भावनिक वळण; दीप्ती आणि अश्विनमधील वैवाहिक संबंधात तणाव वाढला

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत एक भावनिक वळण; दीप्ती आणि अश्विनमधील वैवाहिक संबंधात तणाव वाढला

5 second read
0
0
31

no images were found

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत एक भावनिक वळण; दीप्ती आणि अश्विनमधील वैवाहिक संबंधात तणाव वाढला

 मुंबई, : हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आणि प्रेरणादायक कथानक यामुळे सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ सगळ्यांची लाडकी बनली आहे. पुष्पा (करुणा पांडे) वकील बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे, पण आत्ताची तिच्यासमोर नवीन अडथळे आहेत, ज्यामध्ये तिच्या दृढतेची आणि तिच्या जवळच्या नात्यांची कसोटी होत आहे. अलीकडच्या भागांमध्ये, सोनल (भक्ती राठोड) पुष्पा आणि अश्विन (समृद्ध बावा) त्याच्या अंजना (आर्शी) नामक मैत्रिणीविषयीचे सत्य लपवत असल्याचे उघड करून दीप्तीला (गरिमा परिहार) त्यांचे घर सोडून आपल्याबरोबर येण्यास सांगते.

आगामी भागांमध्ये, प्रेक्षक बघतील की, दीप्ती घर सोडून जाईल आणि याचा ठपका अश्विन आणि पुष्पावर येईल. अश्विनसाठी कठीण काळ असला, तरी दीप्ती करवा चौथसाठी घरी परतते. असे केल्याने सारे काही ठीक होईल अशी तिची अपेक्षा असते, पण अंजनाला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे कळल्यावर अश्विन तिच्याकडे धाव घेतो. नेमकी दीप्ती त्याला अंजनाला ‘आय लव्ह यू’ म्हणताना ऐकते. आणि सहाजिकपणे परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावते.

आपल्या घरातील हा वाढता तणाव पुष्पा कशाप्रकारे हाताळेल?

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “हे कथानक भावनिक घडामोडींनी भरलेले आहे, ज्यात एक आई म्हणून पुष्पाच्या दृढतेची कसोटी होणार आहे. दीप्ती आणि अश्विन या दोघांच्यामध्ये ती सापडली आहे. ते दोघेही दुःख आणि गैरसमजाचे परिणाम सोसत आहेत. एक आई म्हणून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याचे आणि त्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान पुष्पापुढे आहे. हे क्षण पडद्यावर साकारणे हा भावनिक अनुभव आहे, कारण त्यात खऱ्याखुऱ्या कौटुंबिक संघर्षाचे प्रतिबिंब आहे, ज्यात सतत प्रेम, विश्वास आणि धैर्याची कसोटी होत असते. मला आशा आहे की, प्रेक्षकांना पुष्पाचा हा प्रवास आपलासा वाटेल आणि तिच्या भावना ते अनुभवू शकतील.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…