no images were found
मालेगाव स्फोटात निर्दोष ठरलेल्या धर्मयोद्ध्यांचा सत्कार!
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे घडलेल्या बाँबस्फोटानंतर हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय्य कारवाई करून ‘भगवा आतंकवाद’ असा खोटा अपप्रचार करण्यात आला होता. त्या वेळी हिंदूंच्या अस्मितेवर झालेला हा मोठा आघात होता. मात्र ३१ जुलै २०२५ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व सात हिंदु आरोपींना निर्दोष मुक्त केले आणि न्यायप्रणालीने खर्या अर्थाने सत्याला विजय मिळवून दिला. पण प्रश्न अजूनही उरतो, ‘भगव्या आतंकवाद’ हा खोटा प्रचार कोणी, का आणि कशासाठी केला? त्या मागील षड्यंत्राचे धागेदोरे कोणते? या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा विशेष कार्यक्रम रविवार, १३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता देवल क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात मालेगाव प्रकरणातील निर्दोष धर्मवीर समीर कुळकर्णी, मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच या प्रकरणातील हिंदु विधीज्ञ परिषदचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषदचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम भावे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर व्यापक संपर्क व निमंत्रणे !
या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तसेच राज्याचे पाककर्म मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्यासह असंख्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, गडदुर्गप्रेमी, शिवप्रेमी, संप्रदाय, मंडळे, सामाजिक संघटना यांच्या भेटीगाठी चालू आहेत. सर्वत्र या कार्यक्रमाविषयी उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निमंत्रणपत्रिका आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरु आहे. ‘भगवा आतंकवाद’, या अपप्रचारामागचे सत्य समजून घेण्यासाठी, आणि निर्दोष ठरलेल्या धर्मयोद्धयांचा गौरव करण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवभक्त, तरुण व समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे श्री. सुनील घनवट यांनी आवाहन केले आहे.