
no images were found
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड . गुलाबराव घोरपडे यांचे कोल्हापुरात निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 3 वाजता महावीर कॉलेज येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आले.
अॅड. घोरपडे यांना मंगळवारी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयंत तासगावकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी दवाखान्यात धाव घेतली. अॅड. घोरपडे मूळचे कागल तालुक्यातील माद्याळचे. कोल्हापुरात येऊन त्यांनी शिक्षण घेतले. गुलाबराव घोरपडे यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील माद्याळ होते. याठिकाणी ते महावीर महाविद्यालय परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात मुलगा विनायक आणि तीन मुली असा परिवार आहे. वकील म्हणून काम करताना ते सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाले. सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाशी ते निष्ठावंत राहिले. माजी पतंप्रधान इंदिरा गांधी यांच्या अटकेनतंर झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिले. याच काळात अंबाबाई मंदिरात लावलेला संगमरवर काढण्यात आला. अलीकडेच त्यांची अखील भारतीय काँग्रेसच्या सदस्यपदी निवड झाली होती. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे काँग्रेस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.