
no images were found
आदित्य रॉय कपूरचे चकित करणारे रहस्योद्घाटन, त्यातही आईसक्रीमची गंमत!
येत्या शनिवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोमध्ये मनोरंजनाचा धमाका नेहमीपेक्षा जास्तच उडणार आहे. सेटवर गुमराह चित्रपटातील कलाकार – आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर, दीपक कालरा यांच्यासोबतच संगीतकार मिथून आणि विशाल मिश्रा यांचेही आगमन होत आहे. होस्ट कपिल शर्मासोबत संवाद साधताना अत्यंत काटेकोर फिटनेस दैनंदिनीसाठी ओळखला जाणारा आदित्य रॉय कपूर आपले आवडते चिट मील स्नॅक कोणते आहे, ते सांगताना दिसणार आहे.
आपल्या संदर्भाचा उलगडा करत आदित्य रॉय कपूर पुढे म्हणाला, आपल्या चिट दिवशी मनात कुठलाही अपराधभाव न बाळगता आपण एकाच वेळी चक्क अर्धा किलोचा आईसक्रीम टब खाऊन टाकायचो. तो पुढे म्हणाला, “बहुतांश वेळी मी काटेकोर डाएटचे पालन करत असतो. मात्र जेव्हा केव्हा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाने चिट मीलचा वापर केला पाहिजे, असे मला वाटते. आईसक्रीमचे केवळ एक–दोनच स्कूप खाण्यात काय मजा आहे? अन् आईसक्रीम हे शब्दश: हवेसारखेच असते. (हसत हसत).”आपल्यासारखी परफेक्ट जॉ–लाइन कशी मिळवावी, याबाबत आदित्य शोमध्ये काही फिटनेस टिप्सही देताना दिसणार आहे.