no images were found
‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत गणेशाच्या मंगल विवाहाविषयी श्रेनु परीख म्हणते, “श्रद्धा, प्रेम आणि दिव्य आशीर्वाद लाभलेला हा विवाह आहे”
सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ ही मालिका एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. गणेशाचा मंगल विवाह सध्या केंद्रस्थानी असून मालिकेच्या कथानकाला लक्षणीय वळण देणारी ही घटना आहे. या बदललेल्या भागात आनंद सोहळा, कर्तव्य आणि बदल एकत्रित दिसतील आणि प्रथम पूज्य म्हणून गणेशाचे स्थान मजबूत होताना दिसेल. गणेश आपल्या जीवनाच्या या नवीन टप्प्यात केवळ धार्मिक विधींमध्येच नाही, तर जबाबदारी, विनम्रता आणि नेतृत्व या मूल्यांसाठीही सर्वात आधी पूजला जातो.
गणेश (निर्णय समधिया) आणि रिद्धी – सिद्धी (नारायणी वर्णे – श्रेया पटेल) चा विवाह या नवीन अध्यायाच्या केंद्रस्थानी आहे. या मालिकेत पार्वतीची भूमिका करणाऱ्या श्रेनु परीखने या भागाच्या चित्रीकरणाविषयी आणि काही अनपेक्षित क्षणांविषयी सांगितले.
या अनुभवाविषयी सांगताना श्रेनु म्हणते, “गणेशाचे रिद्धी-सिद्धीशी होणाऱ्या या पवित्र मीलनाला श्रद्धा, प्रेम आणि दिव्य कृपेचा आशीर्वाद आहे. गणेश जीवनाच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना पार्वतीचे मन अभिमानाने, आनंदाने आणि त्याला मुक्त करण्याच्या भावनेने भरून गेले आहे.”
ती म्हणते, “एक दिवस हे शूटिंग करत असताना निर्णय लोकांनी, पोशाखांनी घेरलेला होता आणि सगळे काही एकाच वेळी होत होते. मी तशीच दुरून त्याला निरखत राहिले. तो क्षण माझ्या स्मरणात राहिला कारण गणेशाच्या प्रवासातील तो लक्षणीय टप्पा होता. देवी पार्वतीसाठी देखील हा टप्पा आता मार्गदर्शन करण्याचा किंवा सूचना देण्याचा राहिलेला नाही. आजवर सक्रिय सहभाग असलेली पार्वती आता केवळ उपस्थित राहून आपल्या मुलाला आशीर्वाद देत आहे. तो क्षण मला अगदी खराखुरा वाटला.”