Home मनोरंजन या वर्षाने त्यांना घडवले: 2025 चा प्रभाव आणि 2026 साठीचे आपले संकल्प सांगत आहेत सोनी सबवरील कलाकार

या वर्षाने त्यांना घडवले: 2025 चा प्रभाव आणि 2026 साठीचे आपले संकल्प सांगत आहेत सोनी सबवरील कलाकार

15 second read
0
0
17

no images were found

या वर्षाने त्यांना घडवले: 2025 चा प्रभाव आणि 2026 साठीचे आपले संकल्प सांगत आहेत सोनी सबवरील कलाकार

       वर्षाअखेरीस मागे वळून पाहताना दिसते की, सोनी सबने या वर्षात छान छान कथा सादर केल्या आणि टेलिव्हिजनवरील काही लाडक्या व्यक्तिरेखा तुमच्या घरात पोहोचल्या आणि प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. भावना आणि निर्धाराच्या या कथा सादर करणाऱ्या सोनी सबच्या मालिका लक्षावधी लोकांसाठी दैनंदिन मेजवानी आहे. गत वर्षातील आपल्या अविस्मरणीय प्रवासाविषयी बोलताना सोनी सबचे लोकप्रिय कलाकार – श्रेनु परीख, करुणा पांडे आणि सुंबुल तौकीर खान त्या वर्षातील आपल्या सर्वात प्रभावी क्षणाबद्दल आणि पुढील वर्षातील आपल्या आशा तसेच संकल्पाविषयी सांगत आहेत.

     ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत पार्वतीची भूमिका करणारी श्रेनु परीख म्हणते, “2025 हे वर्ष माझ्यासाठी स्वतःचा नव्याने शोध घेण्याचे वर्ष होते. एका विरामानंतर पुन्हा टेलिव्हिजनवर येऊन पार्वतीचे दिव्यत्व आणि ताकद पडद्यावर साकारण्याचे आव्हान पेलत असताना या प्रश्नाचे उत्तर मिळते की, मी मुळात अभिनय कलेच्या प्रेमात का पडले. या भूमिकेने मला प्रत्येक दृश्यात संतुलन, गहनता आणि प्रामाणिकपणा शोधण्यास भाग पाडले. या काळातील माझ्या स्मरणात राहील अशी गोष्ट ही आहे की ही दिव्य व्यक्तिरेखा साकार करताना मला एक स्पष्टता मिळाली. या भूमिकेने मला एकाच वेळी अधिक धाडस आणि करुणा दिली. 2026 मध्ये, हीच निष्ठा मला दररोज सेटवर प्रेरित करत राहील अशी मी आशा करते. मी जे काही करेन त्यामध्ये उद्दिष्ट, फोकस आणि अस्सलता यांच्यासह स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हा माझा संकल्प आहे.”

        पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “या वर्षीही पुष्पा मला चकित करतच राहिली. ती पुन्हा विद्यार्थी बनली, तिने कायद्याचा अभ्यास केला, आपला व्यवसाय उभा केला आणि हे सगळे पडद्यावर करत असताना मला हे जाणवले की, तिच्याबरोबर मी देखील वाढते आहे, बदलते आहे. यातील सगळ्यात संस्मरणीय क्षण कोणतेही एक दृश्य नव्हते, पण एकत्रितपणे तिचे सगळे विजय होते. 2025 या वर्षाने मला ही जाणीव दिली की टेलिव्हिजन एक जबाबदारी आहे, जी आम्ही आमच्या खांद्यावर पेलतो आणि ते करताना मिळणारे छोटे छोटे आनंद एकत्र होऊनच त्याचे मोठे प्रेम आणि सुख बनते. 2026 च्या वर्षात माझा संकल्प पुष्पाच्या व्यक्तिरेखेत आणखी जीव ओतण्याचा आहे, जेणेकरून लोकांच्या या लाडक्या व्यक्तिरेखेची गहनता आणि चिवटपणा आणखी स्पष्ट होईल. असामान्य गोष्टी करणाऱ्या सामान्य स्त्रीचा गौरव मी करतच राहीन.”

      ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता ही व्यक्तिरेखा साकारणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “2025 ने मला पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही नाती आणि नवे बंध निर्माण करण्याबद्दल खूप काही शिकवले. अन्विताचा प्रवास आपल्या जीवनासारखाच वाटतो असे सांगणारे तरुण प्रेक्षकांचे संदेश मला तो लक्षणीय क्षण देऊन जातात. आम्हाला हे जाणून आनंद वाटला की, आमची कहाणी प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन करत नसून लोकांशी संवाद साधत आहे, त्यांच्या भावनांशी साधर्म्य दाखवत आहे. 2026 मध्येही असेच आपलेसे वाटणारे क्षण आम्ही निर्माण करू शकू अशी मला आशा वाटते. माझा संकल्प लोकांना आनंद देण्याचा आणि त्यांच्याशी सुंदर नाते निर्माण करण्याचा आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …